संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :- कामठी तालुक्यातील गादा गावातील शेतात शिरलेल्या पाच फूट लांबीच्या धामण प्रजातिच्या सापाला वाईल्ड वेल्फेअर सोसायटी चे सदस्य व सर्पमित्र अनिल बोरकर यांनी सापाला पकडून रानटी भागात सुरक्षित सोडून जिवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज सकाळी साडे दहा वाजता केली.
कामठी तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले असले तरी धानपिकासाठी हा पाऊस मोलाचा ठरला तर कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोवणीला वेग दिल्याचे दिसून येते यानुसार कामठी तालुक्यातील गादा गावातील रहिवासी व कामठी तहसील कार्यालयाचे शासकीय वाहनचालक युवराज चौधरी यांच्या शेतात रोवणी सुरू असता शेतात एक पाच फूट लांबीचा धामण प्रजातीचा साप दिसल्याने शेतात काम करणाऱ्या शेतमजुरात भीतीचे वातावरण पसरले .दरम्यान युवराज चौधरी यांनी त्वरित कामठी चे सर्पमित्र अमित बोरकर यांच्याशी संपर्क साधुन मदतीची मागणी केली असता सर्पमित्राने त्वरित घटनास्थळ गाठून सापाला ताब्यात घेत सुरक्षित स्थळी रानटी भागात सोडून देत सापाला जीवनदान दिले.