संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पदीसर सौंदरीकरण समिती कामठी चे रेल्वे स्टेशन प्रबंधकला सामूहिक निवेदन
कामठी :- अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत कामठी रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला ही कामठी शहरवासीयासाठी मोठी आनंदाची बातमी असून कोटी रुपयाच्या निधीतून कामठी रेल्वे स्टेशनचा विकासात्मक कायापालट होणार आहे.नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरात असलेल्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठी शहराचे नाव जगाच्या नकाशात कोरले गेले आहे. हे कामठी वासीयांसाठी अतिशय गौरवास्पद बाब आहे तेव्हा अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत पुनर्विकासीत करण्यात येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशनला विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलची प्रतिकृती देण्यात यावी या मागणीसाठी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे मार्गदर्शीत डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समिती कामठीच्या वतीने कामठी रेल्वे स्टेशन प्रबंधक कार्तिक घोष यांना आज सामूहिक निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना राजेश गजभिये,दिपंकर गणवीर, उदास बन्सोड,कोमल लेंढारे,राजेश कांबळे,सुमित गेडाम, अनुभव पाटील,उज्वल रायबोले, गीतेश सुखदेवें,विकास रंगारी,प्रमोद खोब्रागडे,प्रणय फुलझेले,शुभम फुलझेले,रोहित बोरकर,राज तांडेकर, प्रणय खोब्रागडे,रवींद्र मराई, विक्की बोंबले, गोविंद चौधरी, कृष्णा पटेल, आदी उपस्थित होते.