संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पावसाळ्यात बहुधा सापांचा संचार वाहतो परिणामी बहुतांश ठिकाणी साप दिसल्याचे दिसून येते.साप म्हटलं तर कुणालाही थरकाप सुटतो.तेव्हा घरात साप दिसल्यास जिवाच्या सुरक्षतेतेसाठी सर्पमित्राला हाक मारावी लागते. सापापासून संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी साप पकडणाऱ्या सर्पमित्राकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सर्पमित्रांना किमान विम्याचे संरक्षण तरी देण्यात यावे अशी मागणी कढोली ग्रा प च्या माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी केले आहे.
विषारी,बिन विषारी साप पकडणे, त्याला अधिवासात सोडणे त्यासाठी किमान गाडीचे इंधन आणि वेळ त्यांना खर्चावा लागतो या खर्चासाठी त्यांना पदरमोड करावी लागते तसेच हातातली कामे बाजूला टाकून जीव धोक्यात घालून हे काम करीत असताना त्यांच्याकडे सुरक्षेची कोणतेही साधने नसतात तसेच त्यांना स्वखर्च करावा लागतो. सर्पमित्र वेळ,पैसा खर्च करून आणि जीव धोक्यात घालून नागरिकांचे आणि सर्वांचे संरक्षण करीत असतात,पकडलेल्या सापाला दुर किलोमीटर असलेल्या अधिवासात सोडण्यासाठी त्यांना स्वतःच्या गाडीचे इंधन खर्च करून जावे लागते त्यामुळे त्यांना स्थानिक प्रशासनाने किमान विमा संरक्षण सह मानधन द्यावे अशी मागणी लोकनेत्या माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी केली आहे.