संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- विविध आजारावर नियंत्रन मिळण्यासाठी आणि निरंतर निरोगी तसेच सदृढ राहण्यासाठी योग अभ्यास आणि नियमित योगसाधना आवश्यक आहे असे मत नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आज गुरुवारी कामठी-कन्हान मार्गावरील श्री साई मंदिरात सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेमार्फत श्री साई मंदिर समितीला वॉटर कूलर व फिल्टर भेट स्वरूप आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसांगी साई मंदिराचे पुजारी देवनाथ बाबा,माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेचे पदाधिकारी किशोरी भोयर, अनुराधा भोयर, अनुराग भोयर,सलोणी भोयर,अखिलेश भोयर, किशोर धांडे, अजाबराव उईके, कमलाकर मोहोड,राजेश बनसिंगे, राहुल कनोजिया तसेच साई मंदिर समितीचे समस्त मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
साई मंदिरात येणाऱ्या भाविकांना शुद्ध व थंड पाणी मिळावे या उदार हेतूने सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थे च्या वतीने आज गुरुवार ला श्री साई मंदिर समितीला वॉटर कुलर व फिल्टर भेट स्वरूप देण्यात आले.तत्पूर्वी साई मंदिरात आरती करून साई बाबांचा आशीर्वाद घेण्यात आला.दरम्यान श्री साई मंदिर समितीच्या वतीने नवंनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.