महाराष्ट्र सदन येथे भौगोलिक मानांकन उत्पादने विक्री प्रदर्शन

– ग्रामीण उत्पादनांना शहरांशी जोडण्याचा प्रयत्न

– 13 जानेवारीपर्यंत विक्री प्रदर्शन

नवी दिल्ली :- कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे नाबार्डच्या सहकार्याने आजपासून 13 जानेवारी दरम्यान भौगोलिक मानांकन (GI) असलेल्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील स्थानिक उत्पादनांचा समावेश असून, ग्रामीण भागातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रदर्शनाची उद्घाटन प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांच्या हस्ते आज झाले. यावेळी नाबार्ड चे सहाय्यक महाव्यवस्थापक रवींद्र मोरे उपस्थित होते यासह महाराष्ट्र सदन च्या व्यवस्थापिका भागवंती मेश्राम, बांधकाम विभागाचे अभियंते जे डी गंगवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातील येवले मधील भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले दिवटे पैठणी या दालनात पैठणी, सेमी पैठणी, हातमागच्या साड्या तसेच पैठणीच्या जॅकेट, टोपी, हॅन्डबॅग आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील तालुका धडगाव येथील बोंदवाडे मधील ‘आमु आखा एक से’ या शेतकरी उत्पादक कंपनीची आमचूर पावडर, तसेच या जिल्ह्यातील डॉक्टर हेडगेवार सेवा समितीतर्फे भौगोलिक मानांकन प्राप्त झालेली भडक लाल मिरचीचे दालन आहे.

कोल्हापूरमधील कोल्हापूर एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट येथील प्रसिद्ध गूळ, सातारा जिल्ह्यातील मिरज येथे तयार होणारे तानपुरा आणि सितार यांनाही मानाची भौगोलिक मानांकन मिळालेले असून या वाद्यांची छोटी प्रतिकृती मांडलेली आहे.

अकोला जिल्ह्यातील ग्रामपुत्रा जीविक शेती मिशन, शेतकरी उत्पादक कंपनी खापरवाडा यांचे सेंद्रिय मसाले आणि हळद यांचा समावेश आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राधिका महिला बचत गट अंतर्गत तयार करण्यात येणारे काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, शेंगदाणा, जवस, तीळ, कारळ यांच्या चटण्याही या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

दिल्लीतील मराठी नागरिकांसह इतरही लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, भौगोलिक मानांकन मिळालेल्या वस्तू खरेदी कराव्या आणि ग्रामीण भागातील उत्पादकांना सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रदर्शनस्थळ: महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी स्थित नवी दिल्ली

कालावधी: 10 जानेवारी ते 13 जानेवारी

वेळ: सकाळी 10:00 ते सायंकाळी 7:00

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कलाकारांनी लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून उत्तम कार्य करावे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sat Jan 11 , 2025
– महाराष्ट्र शासनाचे कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे उत्तम कार्य – ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन नागपूर :- भारत देशाला कलेचा मोठा वारसा लाभला आहे. या कलेचा विकास करण्यासाठी कलाकारांनी लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून उत्तम कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. तसेच, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्तम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!