नागपूर :- अखिल खेडूला कुणबी समाज नागपूर च्यावतीने संस्थेची आमसभा 14 जानेवारी रोजी सकाळी रविवारला, अध्यक्ष प्रभाकर रावजी पिलारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या उपस्थितीत पार पडली.
समाजाचे अध्यक्ष प्रभाकर पिलारे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे समाजाचे उपाध्यक्ष डॉ. एन.टी. देशमुख यांच्या सभेत यांच्याकडे सभेची पुढील कारवाई करण्याचे अधिकार सोपविण्यात आले होते व त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली समाजातील कार्यरत पदाधिकारी व आजीवन सदस्यांच्या भरगच्च उपस्थितीत सभा संपन्न झाली.
वर्ष 2021 ते 22 व 2022 ते 23 ची आमसभा कुणबी समाजाचे आरध्य दैवत जगद्गुरु तुकोबाराया तसेच हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते सभेला सुरुवात केली.
समाजाचे सचिव सुधाकरराव भर्रे यांनी समाजातील दिव्यांग झालेल्या समाज बांधव व भगिनींना दोन मिनिटांचे मन पाडून श्रद्धांजली वाहिन्यात आली. सभेला उपस्थित सर्व समाज बांधवांचे शब्द सुमनाने स्वागत करून मागील वर्षाच्या सभेचा ठराव वाचून दाखविले तसेच समाजाचे कोषाध्यक्ष संजय बुल्ले यांनी वर्ष 21- 22 व 22 – 23 चा जमा खर्च पत्रक, नफा तोटा पत्रक, व ताळेबंदक पत्रक, वार्षिक सर्वसाधारण सभेत वाचून दाखविला आणि सभेत बहुमताने मंजूर करून घेतला. अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयावर अनेक सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये सर्वश्री माजी अध्यक्ष मधुकरराव शिलारे, उपाध्यक्ष यशवंत कुथे, नरेंद्र नाकतोडे, गजानन बुरडे, रामचंद्रजी पिलारे,, दिनेश तूपटे, एडवोकेट सौरभ राऊत, अमोल राऊत, मनमित पिलारे, अनिता ठेंगरे, वाचेंद्र ठाकूर, राजाराम डोनारकर, सुभाष बुरडे, अरुण खरकाटे, श्रीपतराव बुरडे, रेमुजी कुथे इत्यादी मंडळींनी आपले मत व्यक्त केले. या सभेचे संचालन सहसचिव नंदकिशोर अलोणे यांनी केले तर दिनेश तुपे यांनी आभार आभार मानले आणि राष्ट्रगीताने सभेचे समारोप करण्यात आले.