माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुलाखत

मुंबई  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार दि. 16 डिसेंबर, 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाल नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षातील सामाजिक न्याय विभागाची वाटचाल, विद्यार्थी व दिव्यांगासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, ‘बार्टी’ या संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम, सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न. ग्रामीण व शहरी भागातील गाववाड्यांना समताधिष्ठित नावे देण्याचा निर्णय तसेच ज्येष्ठ नागरिक व तृत्तीयपंथीयांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय आदी विषयांची सविस्तर माहिती मंत्री श्री.मुंडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचे मालमत्ता विषयक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित - महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर      

Thu Dec 16 , 2021
    मुंबई : कोविड प्रादुर्भावामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. मागील दोन वर्षात कोविड  मुळे विधवा झालेल्या महिलांना त्यांच्या मालमत्ताविषयक हक्कापासून वंचित ठेवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे या महिलांचे मालमत्ताविषयक व अन्य आर्थिक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती निश्चित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com