गे मराठी भाषा

माय मराठी किती वर्णू मी तुझी अप्रतिम गाथा

अभिजात भाषा म्हणतांना गर्वाने टेकतो माथा

प्राचीन तुझा इतिहास सांगतो तुच उच्च भाषा

तुझा गोडवा तुझी सरलता हिच तुझी उन्मेषा

स्वर व्यंजने सह बाराखडी तुझा अवयवी थाट

वेदकालीन जन्म तुझा, तूच अभिमानाची वाट

पाषाणी तुझी सापडली पाऊले तूच अजरामर

ग्रंथामध्ये साहित्यिकांची लेखनीत तूच तलवार

कुठे कोकणी कुठे वऱ्हाडी बोलकी तुझी लेकरे

नांदत ओठी महाराष्ट्राच्या भूमीत तूच अवतरे रे

गे मराठी तूझी ओळख होतीस कधीची पोरकी रे

अभिजात मराठी होता, मराठी माणसात गौरवे रे

 – प्रा. नरेंद्र पोतदार

 हरिओम नगर, फॉरेस्ट ऑफिस मागे मु.पो.तह.- तिरोड जि. गोंदिया 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिवजयंतीदिनी राजधानीत दुमदुमला जयघोष !

Thu Feb 20 , 2025
नवी दिल्ली :- ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष . . . शिवप्रेमींची मोठी आणि उत्साही उपस्थिती . . . ढोलताशांचा गगनभेदी गजर. . शाहिरी पोवाड्यांसह निनादणाऱ्या तुताऱ्या . . . मस्तकी विलसणारे भगवे फेटे . . भारतीय सेनेची अनोखी मानवंदना . . . अशा अत्यंत उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज देशाच्या राजधानीत मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिल्लीतील शिवजयंती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!