संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – श्री किसना मारोतराव वरखडे नगरपंचाय त कांद्री चे कर्मचारी यांचा मुलगा गोलु उर्फ गौरव किसना वरखडे वय २६ वर्ष यांचा रविवार (दि.३०) मार्च २०२५ ला घरून मौ़दा कडे जाताना दुपारी दुचा कीने जाताना नागपुर, मौदा भंडारा रोडवर झुल्लर जवळ टेल्लर ट्रक ने ओव्हर टेक करताना टैल्लर ची चैन दुचाकीच्या हेंडला अडकुन दुचाकी ट्रक च्या आत पडुन मागे स्वार रोडवर पडल्याने वाचला तर दुचाकी सह चालक गौरव ट्रक मध्ये येवुन घटनास्थळीच मुत्यु झाला. त्याची अंतिम यात्रा त्याचे राहते घर कांद्री ये़थुन ९:१० वाजता काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला.