संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद तर्फे कार्यरत असलेल्या 19 कचरा संकलन वाहनातून शहरात गेल्या काही वर्षांपासून ‘गाडी वाला आया ,घर से कचरा निकाल ‘हे गाणे भर सकाळी कचरा उचलणाऱ्या वाहनावर लागलेल्या स्पीकरमधुन ऐकायला मिळत आहे.हे गाणे शहरात इतके लोकप्रिय झाले की छोट्या मुला बाळा पासून ते मोठ्यांपर्यंत सगळे जण गुणगुणायला लागले आहेत.
घराजवळ कचरा गाडी येताच घरसे कचरा निकाल गाण्याची धून ऐकून घरातील महिला पुरुष उत्तम प्रतिसाद देत कचरा वाहणात टाकत आहेत.ज्यामुळे काही प्रमाणात का होईना शहर स्वच्छ होण्यास मदत झाली आहे.
शहरात कचऱ्याच्या गाडीत सकाळीच स्पीकरवर हे गाणे वाजू लागताच शहरातील महिला ,पुरुष ,मुले घरातील ओला, सुका कचरा गाडीत आणून टाकतात. काही कालावधीतच शहर स्वच्छतेत महत्वाची भूमिका बजावणारे हे गाणे कामठी शहरात प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. शहरातील अनेक लहान लहान मुले हे गाणे गुंणगूणताना दिसून येत आहेत.
– मुख्यअधिकारी संदीप बोरकर
– कचरा व्यवस्थापन योजने अंतर्गत नगर परिषद च्या वतीने दररोज सकाळी प्रत्येक प्रभागात कचरा गाडी फिरविली जाते .यामुळे घरातील सुका असो की ओला कचरा असो घराबाहेर न टाकता कचरा गाडीत टाकून ‘हमारा कचरा,हमारी जिम्मेदारी ‘समजून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी संदीप बोरकर, स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां, अमोल कारवटकर यासह नगर परिषद प्रशासनाने केले आहे.