गणेशोत्सव मंडळ परवानगी प्रक्रियेस प्रारंभ

– पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता विविध पाऊल उचलण्यात येत आहेत. त्यात गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानगीसाठी होणारा त्रास कमी करण्याकरिता मनपाद्वारे गणेश मंडळांना सोयीस्कर अशी ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली आहे. सोमवार (ता:२६) गणेशोत्सव मंडळ परवानगी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील गणेशमंडळांना घरबसल्या परवानगी मिळावी याकरिता सोयीस्कर व सुलभ अशी ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली आहे. विशेष म्हणजे, यावर्षीपासून “माय नागपूर अँप” द्वारेही गणेश मंडळ परवानगी मिळवू शकणार आहेत. तसेच मागील वर्षी नोंदणी केलेल्यांनी यावर्षी परत नोंदणी करायची गरज नसून, मोबाईल क्रमांक टाकून थेट ओटीपी प्राप्त करता येणार आहे.

नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता मनपा प्रयत्नशील असून, नागरिकांनी देखील पारंपरिक आणि पर्यावरण पूरक अशा गणेश मूर्तींच्या स्थापनेवर अधिक भर द्यावा. असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

अशी करा नोंदणी..

सर्वप्रथम मनपाच्या https://nmcnagpur.gov.in/RTS/ws/user/login.do या संकेतस्थळावर जावे, ‘रजिस्टर’वर क्लिक करून नाव, आडनाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक टाका व Send OTP वर क्लिक करावे. ओटीपी नोंदवून रजिस्टरवर क्लिक करावे. किंवा तुम्हला मनपाच्या ‘My Nagpur’ अँप वरून देखील नोंदणी प्रक्रिया करता येईल.

त्यानंतर खालील स्टेप्स फॉलो करा nmcnagpur.gov.in वेबसाइट वर जा- Services वर क्लिक करा – Right to Services सिलेक्ट करा – “Web Link” वर क्लिक करा – मोबाईल क्रमांक टाकावा- ओटीपी प्राप्त होईल- ओटीपी टाकल्यानंतर- डॅशबोर्ड तुमच्या समोर उघडेल – त्यात गणेश मंडप परवानगी वर क्लिक करून माहिती भरावी.

परवानगी मिळविण्याची पद्धती अटी व शर्ती वाचून ‘ॲग्री’वर क्लिक करा. गणेश मंडप परवानगी चा अर्ज ओपन होईल. यात आवश्यक ती सर्व माहिती भरा.

अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असणारे तपशील भरावे, गणेश मंडळाच्या मंडप स्थळाचा सविस्तर माहिती दर्शविणारा नकाशा अपलोड करावा. यानंतर प्रतिज्ञापत्र डाउनलोड करून त्यात आवश्यक सर्व माहिती भरून स्वाक्षरी करा व अपलोड करावे, यानंतर आपल्याला नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी डॅशबोर्डवर अर्जाची स्थिती तपासा यावर “क्लिक” करावे. नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाद्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि स्वच्छतेचे धडे

Tue Aug 27 , 2024
– महिला समानता दिवसानिमित्त जनजागृती नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि स्वच्छतेचे धडे देण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनामध्ये सोमवारी (ता.२६) महिला समानता दिवसाच्या अनुषंगाने नागपूर शहरातील माउंट कार्मेल गर्ल्स स्कूल, नवचैतन्य स्कूल, लाल बहादुर शास्त्री स्कूल, वंदे मातरम् स्कूल, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, ताजबाग उर्दू हायस्कूल, संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com