संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणारे शेवटचे गाव म्हणून ओळख असलेल्या आवंढी गावात नुकतेच दारूच्या वादातून पत्नीने पतीचा खूण केल्याची घटना घडली असून या घटनेसंदर्भात पोलिसांनी येथील अवैध दारुविक्रीवर बंदी घालण्याचा व्युव्हरचनेतुन काल गतरात्री पोलीस गस्त दरम्यान आवंढी गावात मोठ्या प्रमाणात जुगार सूरु असल्याची गुप्त माहिती मिळताच खुद्द डीसीपी निकेतन कदम यांनी नियोजित पद्ध्तीने सहकारी पोलीस अधिकारी ,कर्मचारीला सोबतीला घेऊन आरोपी संजय येंडे यांच्या घरच्या गायीच्या गोठ्यात अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर यशस्वीरीत्या धाड घातली.या धाडीतून मुख्य आरोपी संजय येंडे वय 53 वर्षे रा आवंढी सह 20आरोपीना ताब्यात घेत त्यांच्याकडून 10 लक्ष 57 हजार 185 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या धाडीतुन नगदी.1,07,505 रुपये,, एकूण 09 मोटर सायकल कि. अं 6,75,000 रुपये, दारू चा मुद्देमाल कि. १०,हजार ७०० रुपये, एकूण 18 मोबाईल फोन्स व इतर मुद्देमाल असा एकूण 10,57,185 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम, पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, एपीआय भातकुले,अंकुश गजभिये,रवी शाहू,योगेश राठोड आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.