गज्जू यादव यांच्या दातृत्वामुळे गावची लाडली तनू गेली सासरी

अनुभवला  डोळ्याचे पारणे फेडणारा असाही एक अविस्मरणीय  विवाह सोहळा 
तू एकटी नाही आम्ही तुझ्यासोबत आहोत, अशा शब्दात भक्कम आधार देत तनु चे   स्वीकारले पालकत्व
रामटेक – मुलींच्या जीवनातील आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे विवाहाचा क्षण होय. मात्र, आई- वडील तसेच बहिण-भावाचे छत्र नसणाऱ्या मुलीच्या मनात कोणते विचार येत असतील याची कल्पनाच करणे शक्य नाही, हे तितकेच खरे. असाच काहीसा प्रकार रामटेक तालुक्यातील मसला येथील तनू मलेवार यांच्या आयुष्यात होण्यापासून मातोश्री काशीदेवी संस्थेचे सचिव अध्यक्ष उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांच्या दातृत्वामुळे  गावची लाडली तनू रविवारी (२३ जानेवारी) खुशी खुशी सासरी गेली आहे.
तनू लहान असतानाच तिचे वडील तिला व आईला सोडून कुठेतरी निघून गेले. यानंतर आई कष्टाने तिचा सांभाळ करीत असताना कोरोना महामारीने गेल्यावर्षी आईचे छत्रही हिरावून नेले. वडीलापाठोपाठ आईचे छत्र हिरावल्याने तसेच भाऊ-बहिण
नसणाऱ्या तनूची स्थिती आभाळ फाटल्यागत झाली होती. अशाप्रसंगी गज्जू यादव यांनी तिला तू एकटी नाही आम्ही तुझ्यासोबत आहोत, अशा शब्दात भक्कम आधार देत तिचे पालकत्व स्वीकारले. वयात आलेल्या तनूच्या लग्नाची सर्वांनाच काळजी होती. अशात भंडारा जिल्ह्यातील कांद्री येथील कुणाल बारई यांनी तिचा हात मांगितला. निराधार तनूच्या लग्नाच्या खर्चाचा प्रश्न उभा टाकला असता लग्नाचा संपूर्ण खर्च गज्जू यादव व मित्र परिवार यांनी उचलल्यामुळे रविवारी श्री हनुमान मंदिर चौक, मसला येथे मोठ्या थाटामाटात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गज्जू यादव यांच्या दातृत्वाबद्दल पंचक्रोशित कौतूक होत आहे.  आज उदयसिंग उर्फ गज्जू यादव सचिव-मातोश्री काशीदेवी बहुद्देश्यीय शिक्षण संस्था,परसोड़ा(वाहीटोला) व उदयसिंग यादव मित्र परिवार के सहयोग से चि.सौ.तनु मलेवार व चि.श्री कुणाल बारई यांचा विवाह सोहळा मसला ग्रामपंचायत बोरी येथे स्थानिक गावकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा झाला. तनु ला आशीर्वाद देण्याकरिता
उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांचे सह नानाभाऊ कंभाले जि.परिषद सदस्य नागपुर,कलाताई ठाकरे सभापती रामटेक,रितेश झाड़े सरपंच बोरी,प्रशांत कामडी सरपंच नगरधन,पिंकी राहाटे पं.स.सदस्य रामटेक,रणवीर यादव,महेश बरगट,अरुण बंसोड़ माजी सभापती,शंकर होलगिरे माजी पं.स सदस्य,मोरेश्वर हिंगे माजी सरपंच, मुकेश सातपुते माजी उपसरपंच,सचिन खागर,मुन्ना बिरनवार,रमेशजी मिसार,फिरोज खान पठान,शरद डडूरे,वैभव काठोके, पिंटू नंदनवार,सागर लोंढे, सुशील राहाटे, सुरेंद्र संगोड़े, महेंद्र दिवटे,सुबोथ लोंढे,पंकज घरजाळे,बलराज चव्हाण, प्रकाश लांबट, मंगल उइके,मोहन भगत,शंकर गनवीर, आशीष कलंबे, संतोष बोरिकर, दुर्गेश नायडू, नितिन बंडीवार, मनीष घोष,कृष्णा पाटिल,रूपेश वनवे,रामरतन गजभिये,सदानंद बावनकुले, पृथ्वीराज उदयसिंग यादव यांच्या उपस्थितित सर्वांच्या सहयोगाने विवाह सोहळा साजरा करण्यात आला.     आयोजनाकरिता मातोश्री काशीदेवी बहु. शिक्षण संस्था परसोडा (वाहिटोला) च्या उपाध्यक्ष मनीषा उदयसिंग यादव, मुख्याध्यापक नरेंद्र फाले, समस्त शिक्षक व शिककेतर कर्मचारी व मित्र परिवार सहकार्य  केले…..प्रस्तुत मंगल कार्यातून जिथे पितृत्व वीस वर्षापूर्वी स्वतःचे जन्मदात्याने हिरावून घेतले व आईचे छत्र कोरोना महामारी(काळाने) हिरावून घेतले अशा तनुचे विवाहित जीवनाची सुरुवात मातोश्री काशीदेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोहनलाल यादव ज्यांनी तनुचे मातृत्व पितृत्व स्वीकारून आपले दातृत्वाची प्रचिती देऊन पालकत्व स्वीकारून  कन्यादान करण्याचा मानस मनात घेऊन तनु व कुणाल यांचा विवाह सोहळा साजरा करण्याचे उत्तरदायित्व उदयसिंह उर्फ गज्जू यादव सचिव-  यांच्याकडे दिले होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महान साहित्यिक, नाटककार, लेखक, स्व. राम गणेश गडकरी को उनकी 103वीं पुण्यतिथि पर किया  याद

Mon Jan 24 , 2022
शेक्सपिअर गडकरी किया  याद गणेश वचनालय, गडकरी युवा मंच, गडकरी स्मृति निलयम, राम गणेश गडकरी कला वाणिज्य जूनियर एवं सीनियर कॉलेज पदाधिकारियों आदि के साथ-साथ गडकरी प्रेमियों की उपस्थितीमे अनेक गणमान्य व्यक्तियोंने दी भावभीनी श्रद्धांजलि सावनेर : प्रसिद्ध नाटककार, भाषाविद् और शेक्सपियर स्वर्गीय राम गणेश गडकरी की विरासत को संजोने वाले सभी संस्था पदाधिकारीने स्वर्गीय राम गणेश गडकरी की स्मृति […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com