गजभिये ले आऊट व नाका नंबर सात येथे बोरवेल मागणी

प्रभाग क्र. एक च्या  नागरिकांची नगरपरिषद  कन्हान प्रशासनाला निवेदन.  
 
कन्हान : –  नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र. एक च्या  गजभिये ले आऊट व नाका नंबर सात येथे मागील अनेक दिवसा पासुन पाण्याची फार टंचाई असल्याने स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रशासना ला निवेदन देऊन तात्काळ बोरवेल करून देण्याची मागणी केली आहे.
         मागील अनेक दिवसान पासुन प्रभाग क्र. एक येथील नागरिकांना पिण्याचा पाण्याची फार टंचाई वाढली असुन या प्रभागात नळ नियमित एक दिवसा नंतर येत असुन पाणी सुद्धा पुरेसे येत नाही. एवढेच नव्हेतर पाईप लाईन व विद्युत लाईन मध्ये  बिगाड होत एक दिवसा आड येणारे नळ ही येत नसल्याने नागरिकांना दिवसेदिवस पाण्याकरिता फार त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांनी भाजपा कन्हान शहर अनु:सुचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी यांच्या नेतृत्वात व भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी फिरोज बिसेन यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करून निवेदन देऊन तात्काळ गजभिये ले आऊट व नाका नंबर सात येथे बोरवेल करून देण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी सुनिल लाडेकर, सरोज विश्वकर्मा, मधुकर तीतरमारे, ‌धीरज गजभिये, आकाश मोहिनकर, सुरश इटनकर, शैलेश शेळके, मयुर माटे, बाळु नागदेवे,  राजेंद्र ऊके, दिपनक र गजभिये, नितेश वासनिक, खेमराज बगडते, शहुल्ली मेश्राम, चंपाबाई गजभिये, रिना पाली, राजश्री रंगारी,  ममता भेलावे, निशा बेलेकर, मालनबाई ढोके, वसंता अनकर, परिनिता अनकर, प्रेरणा नागदेवे, शालु बेलेक र सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आर्थिक क्षेत्रात आत्मनिर्भरता आल्यानेच देश प्रगती करू शकतो

Sat Jun 11 , 2022
–    नागपूरच्या आयकर विभागाचे प्रमुख आयुक्त आर.आर. प्रसाद यांचे प्रतिपादन नागपूर – आर्थिक क्षेत्रात आत्मनिर्भरता आल्यानेच देश प्रगती करू शकतो .खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचे योगदान यासाठी फार महत्त्वाचे ठरते. देशाला आधुनिकतिकडे घेऊन जाण्यासाठी विभिन्न विभागांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे प्रतिपादन  नागपूरच्या आयकर विभागाचे प्रमुख आयुक्त आर.आर. प्रसाद यांनी आज   केले.   डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत अर्थ मंत्रालयाच्या  गुंतवणूक आणि सार्वजनिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!