हुबळी-धारवाडच्या महापौर आणि आयुक्तांची सीओसी ला भेट

गुन्हेगारी नियंत्रण आणि पावसाळी समस्यांवरील नियंत्रण प्रणालीचे केले कौतुक

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या श्रद्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपेरेशन सेंटरला गुरूवारी (ता.१३) सायंकाळी हुबळी-धारवाड महानगरपालिका, कर्नाटकचे महापौर इरेश बी. अंचतगेरी (Iresh B. Anchatgeri) आणि आयुक्त  गोपाळकृष्ण बी. यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी गुन्हे नियंत्रणाबाबतची माहिती जाणून घेतली. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. आणि नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी त्यांना विविध जनकल्याणकारी प्रकल्प व कामांची माहिती दिली.

सिटी ऑपेरेशन सेंटरच्या माध्यमातून नागपूर वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. नागपूर शहरात घडणा-या गुन्हांमध्ये तपासासाठी पोलिस प्रशासनाला सिटी ऑपरेशन सेंटरची मोठी मदत होते. या सेंटरच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. नागपूर स्मार्ट सिटीतर्फे शहरात ३६०० पेक्षा जास्त कॅमरे लावण्यात आले आहेत. या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाते तसेच पावसाळ्यात उद्भवणा-या विविध समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास सुद्धा मदत होते.

महापौर इरेश बी.अंचतगेरी यांनी स्मार्ट सिटीच्या कॅम-यांच्या माध्यमाने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि पावसाळ्यात कामे करण्याची प्रशंसा केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख महेश धामेचा, स्मार्ट सिटीचे डॉ. शील घुले, स्वप्नील लोखंडे, कुणाल गजभिये आदी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com