गडचिरोली : सशक्तीकरण मेळाव्यात महिलांची अन्न व पाण्यासाठी धावाधाव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची तीन तासांपासून प्रतीक्षा

गडचिरोली :- तीन तासांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना अन्न व पाण्यासाठी धावाधाव करावी लागल्याने महिला सशक्तीकरण अभियानाच्या नियोजनावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज, मंगळवारी गडचिरोलीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात होत असून कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरातून आलेल्या महिलांचे हाल झालेले पाहायला मिळाले.

मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. चारशे बस, शेकडो खासगी वाहनांतून हजारो महिलांना ९ जानेवारी रोजी शहरातील एमआयडीसी परिसरातील कोटगल रोड मैदानावर एकाच छताखाली एकत्रित आणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात गडचिरोली येथून होत आहे. यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिलांना एकत्रित आणण्यात आले. मात्र, हजारोंच्या गर्दीत प्रशासनाचे नियोजन कोलमडले.

सकाळी ११ वाजेच्या नियोजित कार्यक्रमासाठी १० वाजेपासून गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. मात्र, दुपारी दोन वाजेपर्यंत मान्यवरांचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे महिला- विद्यार्थी ताटकळून गेले होते. पाण्यासाठी महिला, विद्यार्थी आसन सोडून धावाधाव करताना दिसून आले. दरम्यान, या कार्यक्रमासाठी अधिकाधिक गर्दी जमविण्यासाठी प्रशासनातील प्रमुखांनी तालुकास्तरावरील यंत्रणेला ‘टार्गेट’ दिले होते, अशी चर्चा असतानाच नियोजन कोलमडल्याने अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंजाब नेशनल बँकेमधुन युपीएस च्या नऊ बॅटऱ्या चोरी

Tue Jan 9 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- शहरातील आंबेडकर चौक येथील राष्ट्रीय महामार्गा वरील पंजाब नेशनल बँक मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी युपीएस च्या नऊ बॅटऱ्या चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे.         प्राप्त माहिती नुसार गुरवार (दि.४) जानेवारी ला सायंकाळी ७ वाजता बँकेच्या दाराला कुलुप लाऊन बँकेचे सीनीयर मॅनेजर लक्ष्मण गणपती पराते वय ५४ रा. हुडकेश्वर नागपुर आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com