कलाकारांच्या कलागुणांना जी-२० परिषदेतील प्रतिनिधींचा प्रतिसाद – उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह

मुंबई : जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींना राज्यातील अभिजात कला व संस्कृतीची माहिती देणारे स्टॉल परिषदस्थळी उद्योग विभागामार्फत उभारण्यात आले आहेत. या स्टॉलना या सर्व प्रतिनिधींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.सांताक्रुज येथील हॉटेल ग्रँड हयात येथे जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्टॉल्सना मिळणारा प्रतिसाद याविषयी माहिती देताना कुशवाह बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे सहसंचालक सुरेश लोंढे, उपसंचालक संगीता हिवाळे उपस्थित होते.कुशवाह म्हणाले, या स्टॉलमध्ये बिरडी कला, लातूर येथील बंजारा समाजातील विविध दागिने आणि कपडे, कोल्हापूर येथील चांदीचे दागिने आणि कोल्हापुरी चपला, औरंगाबाद येथील हिमरू शाल आणि पैठणी साड्या, सांगली येथील वाद वृंदांचा स्टॉल यांचा समावेश आहे. गेले दोन दिवसापासून जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती देण्यात येत आहे. या प्रतिनिधींकडून देखील अतिशय उत्सुकतेने विविध प्रश्न या कारागीरांना विचारले जात आहेत. तसेच विशेष कौतुकही केले जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातील ज्यू वारसा स्थळे पर्यटनासाठी खुली करणार - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा  

Fri Dec 16 , 2022
राज्यातील ज्यू वारसा स्थळांचा समावेश करण्यासंदर्भात पर्यटन महामंडळ – इस्त्राईल दरम्यान सहकार्य करार मुंबई : राज्यातील ज्यू वारसास्थळे पर्यटनाच्या नकाशावर यावीत यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई येथील इस्राईलचे महावाणिज्यदूत यांच्यासोबत या स्थळांच्या पर्यटनाबाबतच्या इरादा पत्रावर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे यांसह राज्यातील महत्वाची ज्यू -वारसास्थळांची जगभरातील पर्यटकांना ओळख होईल, असा विश्वास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com