भविष्यवेधी शिक्षणातून विदयार्थी भविष्यासाठी तयार होऊ शकतो- मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर

संदीप कांबळे,कामठी
-मुख्य कार्यपालन अधीकारी योगेश कुंभेजकरांची जील्हा परिषद शाळेला भेट
कामठी ता प्र 25:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पडसाड केंद्र महालगाव येथे आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी शिक्षक यांनी भविष्यवेधी शिक्षणाबाबत सुरु असलेली प्रक्रिया समजून घेण्यासाठी शाळेला भेट दिली.याप्रसंगी जिल्हा परिषद नागपूर चे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, बीडीओ अंशुजा गराटे, गटशिक्षणाधिकारी प्रदीप नागपुरे, शिक्षण विस्तार अधिकारी कश्यप सावरकर, सर्व शिक्षा बांधकाम अभियंता विवेक जैस्वाल, केंद्रप्रमुख राजेंद्र डोर्लीकर, , जुगलकिशोर डोर्लीकर, विशेष तज्ञ शाळेचे नंदकिशोर उजवणे मुख्याध्यापक तसेच शाळेतील इतर शिक्षक या भेटीदरम्यान उपस्थित होते.
आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षणातून पुढे कसे नेता येईल याविषयी शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद साधण्यात आला .भविष्यवेधी शिक्षण ही काळाची गरज समजून यादृष्टीने विद्यार्थी घडविल्यास भविष्यात त्यांना यातून निश्चितच फायदा होईल. भविष्यवेधी शिक्षणावर काम करणाऱ्या वासंती गोमास मॅडम यांनी सदर टीम समोर आपले सादरीकरण केले.
सादरीकरणात वर्ग 6 वीच्या विद्यार्थ्यांना चौरसाच्या माध्यमातून 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची गणिते कशी सोडवता येतात याविषयी प्रश्न विचारले व विद्यार्थ्यांनी त्याची योग्य पद्धतीने समाधानकारक उत्तरे दिली. वर्ग 7 वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यवेधी अध्यापन करण्यासाठी ग्रुप लर्निंग, पियर लर्निंग, विषयमित्र या माध्यमातून अध्यापन कसे केले जाते याविषयी सविस्तर चर्चा समितीसमोर सादर करण्यात आली. वर्ग 7 वीच्या विद्यार्थ्यांना 10 अंकी संख्या तयार करण्याविषयी सांगण्यात आले असता विद्यार्थ्यांनी पाच मिनिटात आपल्या संख्या तयार केल्या. या प्रक्रियातून विद्यार्थी स्वत: शिकु शकतील ही बाब पुढे आली. तसेच इतिहास भूगोल हा विषय या माध्यमातून मुलं स्वतः कसे शिकू शकतील याविषयीही मार्गदर्शन सुद्धा किती महत्त्वाचे आहे हे त्यावेळी समजून सांगण्यात आले..याप्रसंगी मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भविष्यवेधी शिक्षणातून विद्यार्थी भविष्यासाठी तयार होऊ शकतो ही बाब सादरीकरणातून पुढे आली असल्याचे मत व्यक्त केले. वासंती गोमासे यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये सहज बदल घडवून आणता येतो याविषयीचे आपले अनुभव टीम सोबत विशद केले.
शेवटी सर्व उपस्थित भेटीतील मान्यवरांचे स्वागत करून मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्र अस्थिरोग संघटना स्थापना दिनानिमित्त जनजागरण अभियान

Mon Apr 25 , 2022
नागपूर : महाराष्ट्र अस्थिरोग संघटना प्रतिवर्षी १ मे हा संघटनेचा स्थापना-दिवस म्हणून साजरा करते. १ ते ७ मे यानिमित्त अस्थिरोग व आरोग्य याबद्दल जनजागरण सप्ताह साजरा करते. यावर्षी या अभियानाची मुख्य थीम लव्ह फिटनेस अँड प्रिव्हेन्ट ऑर्थोपेडिक डिसीजेस अर्थात शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त रहा आणि हाडांचे आजार टाळा ही आहे. या भूमिकेतून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १ मे रोजी औरंगाबाद येथे एम-ओ-ए डे स्थापना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com