केंद्राकडून टोमॅटोच्या दरात आणखी कपात; उद्यापासून NCCF आणि NAFED द्वारे 70 रुपये प्रति किलो दराने विक्री

नवी दिल्‍ली :- ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (NCCF) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (NAFED) यांना 20 जुलै 2023 पासून टोमॅटोला रु.70/- प्रति किलो या किरकोळ दराने विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. NCCF आणि NAFED द्वारे खरेदी केलेले टोमॅटो सुरुवातीला रु.90/- प्रति किलो दराने विकले गेले होते आणि नंतर हे दर 16 जुलै, 2023 पासून ते रु.80/- प्रति किलोपर्यंत कमी केले गेले. हे दर 70/- किलोपर्यंत कमी केल्याने ग्राहकांना आणखी फायदा होईल.

यावेळी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ग्राहक व्यवहार विभागाच्या निर्देशानुसार, NCCF आणि NAFED ने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईंमधून टोमॅटोची खरेदी एकाच वेळी अशा मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये विकण्यासाठी सुरू केली होती, जिथे किरकोळ दर गेल्या एका महिन्यात सर्वाधिक वाढले होते. दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोची किरकोळ विक्री 14 जुलै 2023 पासून सुरू झाली होती. 18 जुलै 2023 पर्यंत दोन्ही एजन्सींद्वारे एकूण 391 मेट्रिक टन टोमॅटोची खरेदी करण्यात आली होती जी दिल्ली-एनसीआर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार येथील मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये ग्राहकांना सतत विकले जात आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण जिल्हयाची वाहतुक केसेसबाबत विशेष मोहीम

Thu Jul 20 , 2023
नागपूर :- नागपूर जिल्हा ग्रामीण जिल्हातर्गत पोलीस स्टेशन मधील वाहतुक नियमन करणारे नियुक्त असलेले. अधिकारी / अमलदार व वाहतुक शाखा तर्फे वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द निरंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येते. वाढत्या अपघाताचे प्रमाण विचारात घेता व त्याचे विश्लेषण करून रस्ते अपघातांना आळा घालण्याकरीता अपघातास कारणीभूत ठरणाच्या कारणांवर विशेषतः लक्ष देवून त्याव्दारे दि. ०१/७/२०२३ ते १५/७/२०२३ पर्यंत मोटार वाहन अधिनियम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com