कामठी छावणी परिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी निधी लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

मुंबई :- नागपूर जिल्ह्यातील कामठी छावणी परिषद पाणी पुरवठा प्रकल्पासाठीचा उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान (राज्यस्तर) अंतर्गत १०.३८ कोटी रुपये किंमतीच्या कामठी छावणी परिषद पाणीपुरवठा प्रकल्पास दि. २९ ऑगस्ट, २०१९ रोजी शासनाने मंजूरी दिली आहे. या प्रकल्पाच्या कामाचा बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या प्रकल्पात राज्य शासनाचे अनुज्ञेय अनुदान ९.३४२ कोटी रुपये (९०%) आणि कटक मंडळाचा स्वहिस्सा १.०३८ कोटी रुपये (१०%) इतका आहे.

या प्रकल्पास शासनाद्वारे प्रकल्पाचा रुपये ३.११४ कोटी रकमेचा पहिला हफ्ता १ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या व ३.११ कोटी रुपयांचा दुसरा हफ्ता ३ जुलै, २०२३ रोजी वितरीत करण्यात आलेला आहे. तसेच, या प्रकल्पाच्या तिसऱ्या हप्त्यापोटीचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत शासनास प्राप्त झाला असून त्याअनुषंगाने निधीच्या उपलब्धतेनुसार ०.४३ कोटी रुपयांचा निधी २९ ऑक्टोबर, २०२४ रोजी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधीसाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येऊन निधी उपलब्ध होताच कामठी कटक मंडळाच्या या प्रकल्पास निधी वितरित करण्यात येईल, अशी माहिती यावेळी नगरविकास विभागामार्फत देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महापारेषणमध्ये प्रकल्प तात्काळ मार्गी लावावेत - ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Fri Feb 7 , 2025
मुंबई :- महापारेषणचे विविध प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. फोर्ट येथील एम एस ई बी होल्डिंग कंपनी कार्यालय येथे आयोजित महापारेषण कंपनीच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, संचालक सतीश चव्हाण, अविनाश निंबाळकर, सुगत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!