खैरी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार चंद्रशेखर बावनकुळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– खैरी गावात मल्टिपर्प ज हॉल चे भूमिपूजन

कामठी :- कामठी विधानसभा क्षेत्राचा मागील पंधरा वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत असून सध्या विधानपरिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करीत आहे .या विधानसभा क्षेत्राचा विकासात्मक कायापालट करणे ही माझी मौलिक जवाबदारी असून कामठी तालुक्यातील खैरी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच विविध प्रकल्प उभारण्यात येतील असे मौलिक प्रतिपादन आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी खैरी गावात महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग अंतर्गत 1 कोटी रुपयांच्या निधीतून मल्टी पर्पज हॉल च्या बांधकाम भूमीपूजन कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी उपस्थित आमदार टेकचंद सावरकर यांनी खैरी गावात विकासाची गंगा वाहून आणू आणि खैरी गावाचा विकासाचा एक अध्याय म्हणून हे मल्टिपर्पज बांधकाम असल्याचे मत व्यक्त केले.

या भूमीपुजन सोहळ्यात सरपंच योगिता किशोर धांडे, उपसरपंच राम ठाकरे,माजी सरपंच व ग्रा प सदस्य धर्मराज आदमने,माजी सरपंच किशोर धांडे,ग्रा प सदस्यगण,माजी सरपंच बंडू कापसे,नत्थु रघटाटे,लतेश्वरी काळे (भाजप संयोजक, नागपूर जिल्हा बचतगट), आणि धनंजय इंगोले, जयेश रघटाते, श्रीपाद डोरले व ब्रम्हा काळे महामंत्री, कामठी तालुका यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा जीआर काढा - काशिनाथ प्रधान

Sun Jun 23 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 9 फेब्रुवारी 2024 रोजी मुलींना बारावीनंतर 642 अभ्यासक्रमामधील उच्च शिक्षण पूर्णता मोफत दिले जाईल तसेच या शिक्षणासाठी एक पैसाही लागणार नाही आदी घोषणा केल्या होत्या.प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या नंतर यावर्षी अद्यापपर्यंत शासन निर्णय न निघाल्याने विद्यार्थिनीमध्ये संभ्रमावस्था आहे .यासंदर्भात त्वरित शासन निर्णय काढून मुलींच्या मोफत शिक्षणाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com