उत्तरप्रदेश वरून आलेला ३१ टन धान पकडला

 खाद्य विभागाची कारवाई, ट्रक सह एकुण २,८०१४०० रूपयाचा मुद्देमाल जप्त. 
कन्हान : – तालुक्यातील डुमरी शिवारातील सरकारी खरेदी केंद्र येथे उत्तरप्रदेश वरून आलेला ३१ टन धान पकडला. ही कारवाई खाद्य विभागाच्या अधिका-या नी करीत ट्रक व धानाचे बोरे सह एकुण २,८०१४०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला असुन ट्रक ला कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन केला आहे.
         प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.२८) जानेवारी ला सायंकाळी ४ ते ७ वाजता दरम्यान अधिका-याना गुप्त माहिती मिळाल्याने जिल्हा कृषी अधिकारी पोहचले असता सदर प्रकरण खाद्य विभाग अंतर्गत येत असल्याने खाद्य विभाग अधिकारी डी.डी. कोंगे, सहायक डीएमओ वामन पोंगले, कांद्री ग्रा पं उपसरपं च श्यामकुमार बर्वे, तहसिलदार प्रशांत सांगडे, कृषी अधिकारी चंद्रकांत देशमुख सह शेतकरी घटनास्थळी पोहचले असता व्यकंटेश वाकलपुडी यांची शेती जी डुमरी स्टेशन ते मेंहदी रोड वर असुन त्या शेती मध्ये अंदाजे २,००० ते ३,००० में टन गोदाम बांधकाम कर ण्यात आलेली आहे. सदर गोदाम पारशिवनी तालुका सहकारी खरेदी विक्री संस्था पारशिवनी यांनी भाडे वर धान खरेदी केंद्रा करिता घेतले आहे. सदर अधिकारी गोदाम जवळ गेले असता तेथे ट्रक क्र. युपी ७२ ऐटी ३१८८ धानाच्या पोत्या भरून ट्रक उभा होता तेव्हा आजु बाजुच्या शेतकरी बांधवांना विचारणा केली अस ता कोणी काही सांगितले नाही. अधिका-यांनी ट्रक चालक अब्दुल रफीक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि ट्रक सुलतानपुर युपी बाईपास वरूण भरण्यात आला असुन आर्डर प्रमाणे नागपुर येथे जाण्यास सांगितले. आणि मनसर ला पोहचल्या वर ९४२२१०२०३९ या नंबर वर फोन करून माल कोठे उतरवायचा सांगण्यात आलल्याने सदर माल हा सुलतानपुर उत्तरप्रदेश येथुन आणल्याचे ट्रक चालका ने सांगितले. खाद्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असता ट्रक मधील धान बोरे उतरविणे प्रथम  बंद केले. असता ५५ ते ५८ बोरे उतरवुन गोदाम मध्ये ठेवण्यात आले होते व बाकी सर्व बोरे ट्रक मध्येच थांब विण्यात आले. ट्रक चालकाने सांगितले की, सुलतान पुर वरून ३१ टन धान बोरे आणले आहे. सदर ट्रक मध्ये अंदाजे २८,५०० में टन धान साठा भरून आहे. त्यानंतर अधिका-यानी गोदामाची तपासणी केली अस ता ट्रक मधुन उतरविले ५५ ते ५६ धान बोरे गोदाम मध्ये आढळुन आले. तसेच इतर खरेदी विक्री केलेले एकुण अंदाजे ११५२२.६६ क्विंटल धान तपासणी दरम्यान आढळुन आले. गोदामाची तपासणी करीत असतांना शहाजी भांडवलकर, शेखर राऊत, सचिन गजानन घोडमारे आदी सह खरेदी विक्री केंद्र अध्यक्ष सुरेशराव भगत हे उपस्थित होते. सदर कारवाई दर म्यान संपुर्ण गोदामाची तपासणीत असे लक्षात आले कि हा ट्रक आणि धाना सह शासकीय धान खरेदी विक्री केंद्रावर डुमरी येथे अधिकृत विक्री करीता आणि शासकीय अनुदान कापण्याचा उद्देशाने आणला होता. या बाबत खाद्य विभागाच्या अधिका-यांनी ट्रक किंमत अंदाजे २२,००, ००० व ३१ टन धान बोरे किंमत अंदा जे ६०,१४०० असा एकुण २८,०१, ४०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून ट्रक ला कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आला आहे.
          ही जी कारवाई करण्यात आली ही शेतक-यांच्या दुष्टीने महत्वाची असुन कारवाई पुर्णत: व्यवस्थि त करून दोषीवर कठोर शिक्षा करण्यात यावी. अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

ज्येष्ठ नागरिकांना  खासदार हेल्थ कार्डच्या माध्यमातून  वैद्यकीय मदत होईल -‌केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन  गडकरी

Mon Jan 31 , 2022
नागपूर  – ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्त  झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीच्या अभावी चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत . अशा नागरिकांना खासदार हेल्थ कार्डच्या माध्यमातून  मदत होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन  गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले.  नागपूरच्या पाचही विधानसभा क्षेत्रातील निवडक पाच अशा एकूण 25 ज्येष्ठ नागरिकांना नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत  होते. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com