नागपुर – नागपुरातील भरतवाडा, पुनापूर भागात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामात शिस्त यावी,अर्धवट कामे जी कासवगती ने सुरू आहेत, त्यामुळे सतत होणाऱ्या दुर्घटना, कामाच्या जागी सुरक्षा रक्षक नसणे व सुरक्षेविषयीचे कुठलेही नियम कंत्राटदाराकडून न पाळणे,काम करणाऱ्या कंत्राटदाराना याविषयी सांगूनही सुधारणा न होणे, त्यांची वाढती मुजोरी, एक काम पूर्णत्वास नसतांना दुसऱ्या बाजूला काम सुरू करून अर्धवट अवस्थेत सोडून देणे या सर्व प्रकारामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांना होणारा नाहक त्रास या व संबंधित अनेक महत्वपूर्ण प्रश्नांवर मनसे नागपुरातील पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्य अधिकारी भुवनेश्वरी एस (भा प्र से) यांची भेट घेतली सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले, मनसेने उपस्थित केलेल्या काही प्रश्नाबाबत त्वरित निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना भुवनेश्वरी एस यांनी त्याबाबत निर्देश दिले,मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर अध्यक्ष विशाल बडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उप शहर अध्यक्ष प्रशांत निकम,शहर सचिव घनश्याम निखाडे,महिला सेना शहर अध्यक्ष मनीषा पापडकर, विभाग अध्यक्ष उमेश उत्तखेडे (पूर्व)शशांक गिरडे (मध्य)पूर्व विभाग उपाध्यक्ष व या भागातील रहिवासी पवन साहू,विभाग सचिव राहुल वंजारी, मनविसेचे उपजिल्हाअध्यक्ष गौरव पुरी,मोहन महाले, मंजुषा पानबुडे संजय पळसकर,गोकुल वरेकर,राजू तभाने व इतर उपस्थित होते.
स्मार्ट सिटी विभागाकडून होणाऱ्या अनागोंदी कारभाराला आळा घालून दररोज होणाऱ्या दुर्घटना टाळा मनसेचे निवेदन.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com