1 जुलैपासुन मनपातर्फे ” आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धेचे “आयोजन

– नोंदणी सुरु,मिळणार रोख बक्षिसे

– गट बनवुन घेता येणार सहभाग

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान ” आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धा ” आयोजीत करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत शहरातील प्रत्येक उपलब्ध मोकळ्या जागेत वृक्ष लागवड मोहीम राबविली जाणार आहे.

अलीकडच्या काही वर्षात सातत्याने होणाऱ्या तापमान वाढीने काय व किती त्रास होऊ शकतो हे सर्वांनी अनुभवले आहे. वृक्षांची कमी होत असलेली संख्या यास प्रामुख्याने कारणीभुत आहे. तापमान वाढीची परिस्थिती सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हिरवेगार आच्छादन वाढवणे आणि झाडे लावून निसर्गाचे सौंदर्य परत आणणे. वृक्षारोपण मोहीम हा हवामान बदलावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याने शहरातील प्रत्येक घरी,रस्त्याकडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत स्थानिक सामाजिक संस्था, एन.जी.ओ, ओपन स्पेस विकास समिती, विविध क्लब, जेष्ठ नागरिक मंडळे, युवक-युवती मंडळे, तसेच महिला मंडळे यांना सहभाग घेता येणार असुन,वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे संगोपन करणाऱ्या गटांना मनपातर्फे रोख पारितोषिक देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा अधिकृत सामाजिक संस्था / नोंदणीकृत क्लब व नागरिकांसाठी खुला गट अश्या २ गटात घेतली जाणार असुन स्पर्धेची नोंदणी सुरु झाली आहे. — https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd999wyWOfqP_4VKfDGI0ATkn0h6IiK0TIYUUbqVN6RpVaYbA/viewformया गुगल लिंक द्वारेही स्पर्धेत भाग घेता येणार असुन सदर लिंक मनपाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे तसेच अधिक माहितीसाठी मनपा उद्यान विभाग येथे किंवा 8668708435, 9767730743, 7498954976 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

बक्षिसे –  

अधिकृत NGO/क्लब्स (नोंदणी कृत) करीता –

प्रथम बक्षिस :- 21000/-

द्वितीय बक्षिस :- 15000/-

तृतीय बक्षिस :- 11000/-

प्रोत्साहन पर 3 बक्षिस :- 5000/-

नागरिक गट (खुले) करीता –

(बचत गट, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, योग नृत्य, योगा क्लब, सायकल क्लब, महिला मंडळे इ.)

प्रथम बक्षिस :- 21000/-

द्वितीय बक्षिस :- 15000/-

तृतीय बक्षिस :- 11000/-

प्रोत्साहन पर 3 बक्षिस :- 5000/-

स्पर्धेच्या अटी – शर्ती –

NGO/गटांनी सुचविलेले स्थळ मनपा मार्फत तपासणी करून गटांना उपलब्ध करण्यात येईल.

स्थळ –

1. शासकीय जागा (ओपेन स्पेस / रस्त्याच्या कडेला इ.).

2. सार्वजनिक जागा असावी.

3. जागेचा आकार किमान 1000 sq. Feet किंवा रस्त्यालगत असल्यास अंतर 500 मिटर असावे.

> वृक्ष पुरवठा मनपा द्वारे करण्यात येईल.

> सदस्य – चंद्रपूर शहरातील रहिवासी असावेत.

> स्पर्धे मध्ये फक्त गट बनवुन सहभागी होता येईल.

वृक्ष लागवड केल्यावर वृक्षाची जोपासना करणे आवश्यक राहील .

गटांनी पर्यावरण जागृती करिता या काळात विविध उपक्रम राबविणे आवश्यक राहील.

केलेल्या कामाची प्रचार,

प्रसिद्धी करणे आवश्यक राहील

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी इंडो जर्मन टूल रुम कौशल्य विकास प्रशिक्षण

Fri Jun 21 , 2024
–  29 जून पर्यंत अर्ज करता येणार  नागपूर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व इंडो जर्मन टूल रुम (IGTR) 2024-25 यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर प्रशिक्षण केंद्राच्या 125 जागांसाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या युवक-युवतीसाठी नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षणाकरिता 29 जून 2024 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!