नागपूर, ता. २८ : नागपूर महानगरपालिकेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंतीच्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताकदिनी स्वातंत्र्य संग्राम सैनिक यादवराव देवगडे यांचा घरासमोर नाव फलक लावण्यात आले.
यावेळी नगरसेवक अमर बागडे, नगरसेविका डॉ. परिणीता फुके, रघुबीर देवगडे, आकाश पांडे, गणेश अजमीरे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, मनपातर्फे हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. देशाला गुलामीतूनकाढण्यासाठी नागपूरच्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी मोठी भूमिका बजावली होती त्या स्वातंत्र्य सैनिकांच्याघरासमोर नामफलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या परिवारातून कोणीस्वातंत्र्य सैनिक होते याबद्दल माहिती व्हावी, भारतीय स्वातंत्र्यामागील आपल्या शहरातील व्यक्तींचे योगदान, त्यांचेबलीदान नव्या पिढीला माहित व्हावे. त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरातील ३०१ स्वात्रंत्र्य सैनिकाच्या घरी नाव फलक लावण्यात येणार आहेत. श्री. यादवराव देवगडे यांना १९४२ मध्ये इंग्रजांच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनात लकडगंज कारागृहामध्ये ३ दिवस ठेवण्यात आले होते. यादवराव देवगडे १९७१ मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. सध्या ते स्वातंत्र्य संग्राम गौरव समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे चिरंजीव रघुवीर देवगडे हे संयोजक आहेत. झिरो मॉईल येथील शहिद गोवारी स्मारकामध्ये त्यांची मोठी भूमिका होती.
यावेळी यादवराव देवगडे म्हणाले, नागपूर शहरात मनपाद्वारे स्वातंत्र्य सैनिकांचा अशा पद्धतीने होणारा सन्मान कौतुकास्पद आहे. त्यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांचे आभार व्यक्त करून शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाला करात माफी देण्याची सूचना केली.