संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– १०४ नागरिकांना मोफत चष्मे वाटप सह १८६ नागरिकांनी शिबीराचा घेतला लाभ.
कन्हान :- बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे रामकृष्ण मठ नागपुर व महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करून १०४ नागरिकांना मोफत चष्मे वाटप सह १८६ नागरिकांनी शिबीराचा घेतला लाभ.
नि:शुल्क मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका विशाखा ठमके, प्रमुख अतिथी स्वामी ज्ञानमुल्यानंद महाराज, स्वामी ब्रम्हमयानंद, जनमोहन अपुर, संदिप वाईकर सह आदी मान्यवरांचा हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून कार्य क्रमाची सुरूवात करण्यात आली.
यात महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर यांच्या पथकाचा सहकार्याने एकुण १८६ नागरिकांच्या नेत्राची तपासणी करून मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली. १०४ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. ७० नागरिकांना नेत्र शस्त्रक्रिया करण्याकरिता महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर येथे नेण्यात आले आणि १२ नागरिकांना औषधे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर शेंडे यांनी केले, सुत्रसंचालन यतीन पशिने यांनी तर आभार ज्ञानप्रकाश यादव यांनी व्यकत केले.