सारथीतर्फे ‘मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण’

– ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार

नागपूर :- ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ पुणे, (सारथी) यांच्यातर्फे मोफत मधमाशी पालन प्रशिक्षणाकरिता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत कुणबी-मराठा या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवतींना शैक्षणिक वर्ष २०२४-२५करिता अर्ज करता येणार आहे. सारथीच्या खर्चाने ‘केंद्रीय मधमाशी संशोधन,प्रशिक्षण संस्था पुणे व मध संचलनालय, महाबळेश्वर, सातारा’ या प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या उपक्रमासंदर्भात विस्तृत माहिती सारथीच्या http://sarthi-maharashtragov.inया अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहिती www.kvic.org,in व www.mskvib,org या संकेतस्थळांवर देण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेत लक्षित गटातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, नागपूर सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय सुरेश बगळे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा मनपाद्वारे सन्मान

Thu Aug 15 , 2024
– ‘तिरंगा अभिवादन’ : मनपा आयुक्तांनी केले सन्मानित नागपूर :- केंद्र आणि राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ‘तिरंगा अभिवादन’ उपक्रमांतर्गत नागपूर शहरात राहत असलेले स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या निवासस्थानी भेट देउन सत्कार करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता.१४) ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com