नागपूर : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाद्वारे दिव्यांगांसाठी एडीआयपी योजना आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत मोफत सहायक साधने वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनपाच्या माध्यमातून रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या शिबिराला रविवारी (ता.२७) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधला आणि शिबिराबद्दल माहिती घेतली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि सीआरसीचे संचालक प्रफुल्ल शिंदे उपस्थित होते.
विशेष म्हणजे, शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत ३ हजारावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
समेकीत क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वास एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र, (दिव्यांगजन), (सी.आर.सी–नागपूर) एएलआयएमसीओ, जिल्हा प्रशासन, जिल्हा समाजकल्याण, जिल्हा परिषद, नागपूर आणि नागपूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तीकरिता एडीआयपी तपासणी शिबिर आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेद्वारे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक साहित्याच्या वाटपाकरिता विविध शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून तीन हजारावर नोंदणी झाली आहे.
दिव्यांगांसाठी आवश्यक कागदपत्रे / पात्रता
– जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
– मासिक उत्पन्न १५ हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक.
– पूर्ण पत्ता असल्याचा दाखला/आधार कार्ड
– दोन पासपोर्ट फोटो
· चालण्यासाठी काठी
· कॅलीपस
· कुबडी
· कृत्रिम अवयव
· तीन चाकी खुर्ची
· श्रवण यंत्र
· तीन चाकी सायकल
· शैक्षणिक संच
· संडास खुर्ची
· ब्रेल कीट (दृष्टीहीन करिता)
· व्हील चेयर
· स्मार्ट फोन (दृष्टीहीन करिता)
· ट्रायसायकल (बॅटरी)
· स्मार्ट केन (दृष्टीहीन करिता)
वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे / पात्रता
– वय ६० वर्षापेक्षा जास्त
– वार्षिक उत्पन्न १ लाख ८० पेक्षा कमी
– आधार कार्ड
– उत्पन्नाचे प्रमाणपत्र /बी.पी.एल. कार्ड
– पासपोर्ट फोटा (४)
राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे
· चालण्यासाठी काठी
· संडास खुर्ची
· कुबडी
· कमरेचा पटटा
· श्रवणयंत्र
· मानेचा पटटा
· तीनचाकी खुर्ची
· चष्मा
· दाताची कवळी