मुलांचे शासकीय वसतीगृह नेर येथे मोफत प्रवेश प्रक्रीया सुरु

यवतमाळ :- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या मुलांचे शासकीय वसतीगृह नेर नबाबपूर येथे रिक्त जागेवर प्रवेश देण्यासाठी वर्ग 8 वी, 11 वी व बिए, बिकॉम, बिएस्सी प्रथम वर्षाकरिता प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे.

अनुसुचीत जातीसाठी 80 टक्के, अनुसूचीत जमाती 3 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी 5 टक्के, इतर मागासवर्ग 5 टक्के, विशेष मागासप्रवर्गासाठी 3 टक्के, अनाथ 2 टक्के व अपंगासाठी 3 टक्के जागा राखीव आहे.

प्रवेश घेण्यासाठी मागील शैक्षणिक सत्रातील गुण पत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वसतीगृहाचे गृहपाल दिपक धावडे यांच्याशी 9823723802 या क्रमांकावर संपर्क साधावा असे वसतीगृहाच्या गृहपालांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Wed May 22 , 2024
गडचिरोली :- भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे. या पुस्तिकेच्या मजकुराचा क्युआर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही शिफारशी, सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तलय पूणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com