अरोली :- मागील शेकडो वर्षांपूर्वीपासून परंपरेला जपत यावर्षी सुद्धा धानला-चिरव्हा जिल्हा परिषद क्षेत्र व धानला पंचायत समिती गण अंतर्गत येत असलेल्या दहेगाव येथे होळीच्या शुभपर्वावर चार दिवसीय सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाची सुरुवात उद्या दिनांक 15 मार्च शनिवारपासून बैलांच्या ईनामी शंकरपटाने होणार आहे.
15 मार्च शनिवारला रात्री नऊ वाजता सुभान मंडळ दहेगाव द्वारा प्रस्तुत नव अंकी नाट्यपुष्प सहस्त्र अर्जुन वध उर्फ परशुराम अवतार, कलंगी मंडळ दहेगाव द्वारा प्रस्तुत नव अंकी नाट्यपुष्प भाऊबीज उर्फ पती को फासी, 16 मार्च रविवारला डायमंड स्टार डान्स व लावणी ग्रुप भंडारा यांच्या लावणीचा कार्यक्रम, 17 मार्च सोमवारला रात्री नऊ वाजता कव्वाल टी. व्ही. सिंगर मुंबई विकास राजा विरुद्ध कव्वाल टी .व्ही. सिंगर मुंबई धम्मज्योती शिंदे यांच्या तिकीट दर असलेला दुय्यम कव्वालीच्या शानदार मुकाबला, 18 मार्च मंगळवार ला रात्री नऊ वाजता तिकीट दर असलेला दुय्यम लावणीच्या महामुकाबला.
शंकरपटाचे उद्घाटन १५ मार्च शनिवारला दुपारी तीन वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्यामकुमार बर्वे, विशेष अतिथी माजी मंत्री सुनील केदार ,प्रमुख पाहुणे माजी आमदार टेकचंद सावरकर ,माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर, माजी जि प उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव राजाभाऊ तिडके, माजी जि प सदस्य देवेंद्र गोडबोले, माजी जि प सभापती अवंतिका लेकुरवाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती मौदा सभापती राजेश ठवकर, भाजपा महामंत्री अनिल निधान, विशेष पाहुणे ग्रामपंचायत सरपंच दहेगाव भारती संदीप आंबीलढूके, उपसरपंच रवींद्र ढोमणे, ग्रामपंचायत सदस्यगण राजेश आंबीलढूके , निरंजन हटवार, काशिनाथ गिर्हेपुंजे , प्रीती विजू हटवार ,एकादशी आंबीलढूके , पुष्पा आंबीलढूके , योगिता देशमुख ,छबु घडोले, तंटामुक्त समिती अध्यक्ष भगवान आंबीलढूके , पोलीस पाटील प्रभाकर अहिरकर, कोतवाल रोहित आंबीलढूके, माजी सरपंच मोरेश्वर आंबीलढूके, सदूकर हटवार ,विश्वनाथ आंबीलढूके, माजी उपसरपंच बंडू शेंद्रे ,मोरेश्वर आंबीलढूके, संदीप आंबीलढूके, परमेश्वर देशमुख सह गावातील परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी पुढारी मान्यवर उपस्थित राहणार असून या चार दिवसीय भरगच्च सांस्कृतिक, सामाजिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान समस्त दहेगाववासीयांनी केले आहे.