संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– ऑटो, लोखंडी पाईप सह एकुण ९६,००० रुपयाचा मुदेमाल जप्त.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत वाकीटाकी टाॅवर एरिया वेकोलि जुने गोंडेगाव रोड परिसरातुन चार आरोपी तीन चाकी ऑटो मध्ये लोखंडी पाईप चोरुन नेतांना मिळुन आल्याने पोलीसांनी चारही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ९६,००० रुपयाचा मुदेमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला.
वेकोलि गोंडेगाव प्रभारी सुरक्षा रक्षक ओम प्रकाश रामचंद्र पाल वय ५५ वर्ष रा. टेकाडी यांना सुरजलाल भारत रच्छोरे वय ३६ वर्ष यांनी फोन द्वारे माहिती दिली कि, वाकीटाकी टॉवर एरीया वेको लि. जुने गोंडेगाव रोड येथे काही इसम चोरी करित आहे. अश्या माहिती वरून ओमप्रकाश पाल यांनी स्टाॅफ सह घटनास्थळी पोहचुन आरोपींना ताब्यात घेऊन घटनेची माहिती पोलीसांना दिली.
कन्हान पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन आरोपींना विचारणा केली असता चोरी करुन नेत असल्याचे कबुल केल्याने पोलीसांनी पंचनामा करुन आरोपी १) विकास उर्फ पिंटु छेदीलाल गुप्ता, २) दिपक बडेलाल कश्यप, ३) सौरभ बिसुनदेव साहानी तीनही रा. कोळसा खदान, ४) विजयबहादुर राममिलन कबिरदास रा. नागुपर यांना अटक करुन त्याचे जवळुन ३ चाकी ऑटो एम एच ४० बी झेड १८७७ किंमत ७५,००० रु, लोखंडी पाईप ६ नग किंम त २०,००० रु, वजन काटा किंमत १००० रु असा एकुण ९६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे ला ओमप्रकाश पाल यांचा तक्रारी वरून आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार भोजराज तांदुळकर हे करित आहे .