संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सौंदर्यीकरणाचा विषय अजूनही प्रलंबित असून कामठी नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितामुळे या परिसराची दुरावस्था अजूनही कायम आहे !ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सौंदर्यीकरणाचा विषय मार्गी लागावा यासाठी आंबेडकरी अनुयायांनी माजी राज्यमंत्री ऍड. सुलेखा कुंभारे यांनी पुढाकार घ्यावा असे विनंती निवेदित करण्यात आले होते.या विनंती निवेदनला ऍड सुलेखा कुंभारे यांनी स्वीकृत केले. व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या मुख्य मार्गदर्शनार्थ नुकतेच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समिती गठीत करण्यात आली.
या समितीचे मुख्य मार्गदर्शक माजी राज्यमंत्री ऍड. सुलेखा कुंभारे असून या समितीत प्रमोद खोब्रागडे, उदास बन्सोड, राजेश गजभिये, संदीप कांबळे, विकास रंगारी, सुमित गेडाम, अनुभव पाटील, गीतेश सुखदेवें, दिपंकर गणवीर, तिलक गजभिये, अविनाश ऊकेश, सुभाष सोमकुवर, सुशील तायडे, राजन मेश्राम, कोमल लेंढारे, आशिष मेश्राम, आनंद गेडाम, रायभान गजभिये, मंगेश खांडेकर,अविनाश दहाट, मनोज रंगारी यांचा समावेश असून या समितीत काम करणाऱ्या इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन समितीचे मुख्य मार्गदर्शक माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी केले आहे.