संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9 :- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची शुक्रवार दि. 8/07/2022 रोजी सकाळी 8:00 वाजता भर सभेत गोळया घालुन हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय दुर्देवी व मनाला दुख देणारी आहे.
जपान सहित भारताला सुध्दा जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या आकस्मिक निधनाने धक्का बसलेला आहे. जपान व भारताची मैत्री पंतप्रधान पदावर नसतांना सुध्दा शिंजो आबे यांनी कायम ठेवली. शिंजो आबे यांचे भारतात बुलेट ट्रेन सारख्या अनेक प्रकल्पात पुढाकार घेण्यात अमुल्य योगदान राहलेले आहे.
उल्लेखनीय आहे की, जपानव्दारे भारतातील बुध्दगया, सारनाथ, कुशीनगर सह बौध्दस्थळांना मोठया प्रमाणात अर्थसहाय्य केल्या जाते. त्यामध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा नेहमी पुढाकार राहलेला होता.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या होने ही घटना अत्यंत धक्कादायक, क्लेशदायक असुन मनाला वेदना पोहचवनारी आहे. अशी शोक संवेदना ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री अँड. सुलेखा कुंभारे यांनी एका पत्रकाव्दारे व्यक्त करून श्रध्दांजली दिली.