संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठीता प्र 31 :- केंद्रात भाजप ची एकहाती सत्ता असून राज्यात नुकतेच अस्तित्वात आलेली शिंदे भाजप ची सत्ता आहे.,कामठी विधानसभा क्षेत्रात आमदारकीची हेट्रिक मारीत माजी पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानसभा क्षेत्रात भाजप चा झेंडा रोवत या विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासात्मक कार्यातून विकासपुरुष ची ओळख सुद्धा करवून घेत निवडणुकीत स्वतःला पक्षाची तिकिट मिळाली नव्हती तरी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवार टेकचंद सावरकर यांना निवडून आणत त्यांना आमदारकीचा पदभार मिळवुन देण्यात यश गाठले तर समाजाच्या तळागळातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा यासाठी शासन विविध कल्याणकारी शास्कोय योजना राबवून गाजावाजा करीत असला तरी या योजना खऱ्या गरजवंत लाभार्थ्यांकडे पोहोचत नसल्याने ह्या योजना श्रीमंतासाठी तारक तर गरिबांसाठी मारक ठरत आहे परिणामी कामठी बस स्टँड चौकातील कडेला मागील 60 वर्षे पूर्वीपासून वसलेल्या ‘सराय’ झोपडपट्टीतील नागरिक आताही घरकरापासून अजूनही वंचित आहेत तसेच शासनाचे पंतप्रधान आवास योजना,प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना,दिव्यांग योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सार्वजनिक शौचालय योजना यासारख्या विविध योजनेपासून अजूनही वंचित राहल्याने आज एक पिढी लोटूनही ‘सराय’झोपडपट्टीत राहणाऱ्या आम आदमीच्या वाट्याला अजूनही अपेक्षाच उरल्या आहेत तर आजही हे नागरिक तळहातावरचं जिणं जगत आहेत.या झोपडपट्टी वासीयांचा निवडणुका आल्या की मतदानासाठी वापर करण्यात येतो मात्र इतर योजनेच्या लाभासाठी वटाण्याच्या शेंगा दिल्या जातात.तेव्हा गोरगरिबांची हक्काचो सत्ता म्हणून महाराष्ट्रात सत्ता स्थापित झालेल्या शिंदे भाजप च्या काळात या सराय झोपडपटटी वासीयांना घर कर लागू होण्यापासून इतर शासकीय योजनेचा लाभ मिळणार का?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करोत आहेत.
येथील बस स्टँड जवळील ‘सराय’झोपडपट्टीत जवळपास 50 कुटुंब मागिल 60 वर्षांपासून वास्तव्यास असून मुख्यता ‘कैचीधार’करण्याच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .यांचे मतदार यादीत नावे येत असून मतदानाचा हक्क गाजवतात, यांना रेशन कार्ड ची सुविधा आहे मात्र मुख्य गरजेचे असलेले अनेक मूलभूत सोयी सुविधेपासून हे कुटुंब अजूनही वंचित आहेत.या कुटुंबाना अजूनही पिण्याच्या पाण्याची सोय नसून पाण्याची पाईप लाईन सुद्धा घातली नसल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या पिण्याच्या पाईप लाईन मधून वाहणारे पाणी जमा होत असलेल्या डबक्यातुन पिण्याच्या पाण्याची गरज भागवत आहेत येथील सार्वजनीक शौचालय ची पुरेशी सोय करून न दिल्याने सांडपाणी वाहून नेण्याची सोय सुद्धा केलेली नाही , येथील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना चा सुद्धा लाभ मिळू न शकल्याने येथील कुटुंब अजूनही चुलीवरच्या जेवणावर जगत आहेत .याप्रकारच्या विविध मूलभूत सोयीपासून येथील नागरिक अजूनही वंचित राहल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सन 1995 पूर्वीच्या झोपडपट्या नियमित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असले तरी शहरातील रामगढ, सैलाबनगर, वारीसपुरा,आझादनगर, कामगार नगर, यासारख्या झोपडपट्ट्याना अजूनही नियमित करण्यात आले नाही या सर्व झोपडपट्ट्या विविध प्रयोजनासाठी आरक्षित असल्या तरी महसूल विभाग व नगर परिषद च्यामालकीचे आहेत तसेच बस स्टँड जवळील सराय झोपडपट्टी कित्येक वर्षपासून अस्तित्वात असून मूलभूत सोयी सुविधेपासून अजूनही वंचित राहल्याने तळहातावर जीन जगणाऱ्या या उपेक्षित समाजाकडे शासनाने लक्ष पुरवावे अशी मागणी जोर धरत आहे.