मुंबई – अवैध वाळूचोरी हा मोठा प्रश्न असून याबाबत महसूल विभागामार्फत काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे वाळू धोरण राबवितांना त्यात सहजता कशी येईल, याबाबत प्रयत्न करण्यात येत असून वाळू धोरणात काही बदल करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरातील अवैध रेतीची 8 प्रकरणे निदर्शनास आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या ठिकाणी सापडलेला साठा तसेच यंत्रे जप्त करण्यात आली आहे, अशी माहितीही महसूल मंत्री थोरात यांनी यावेळी दिली.
विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी लाखांदूर येथे वाळू चोरी होत असल्याबाबतचा व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. याबाबत योग्य ती चौकशी करावी, असे निर्देशही सभापती यांनी महसूलमंत्री यांना दिले.
अवैध रेती चोरीसंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, प्रविण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, अभिजित वंजारी यांनी विचारला होता.