चंद्रपूर : शहर महानगरपालिका क्षेत्रात कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी, रेबीज निर्मूलनासाठी आणि मनुष्य- कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी ऍनिमल बर्थ कन्ट्रोल (डॉग्स) रुल २००१ नुसार कार्यवाही करण्याकरीता दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार देखरेख समितीची बैठक पार पडली.
बैठकीला सहाय्यक आयुक्त नरेंद्र बोबाटे, सहाय्यक आयुक्त सचिन माकोडे, पशु संवर्धन विभागाचे डॉ. पी. डी. कडुकर, मनपाच्या स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, प्यार फॉन्डेशनचे देवेंद्र रापेल्ली उपस्थित होते.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या समस्यांकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाची देखरेख समिती स्थापन करण्याचे शासन निर्णय क्रमांक याचिका क्रमांक-२०१६/प्र.क्र.२७५/नवि-२०, दिनांक ११/०८/२०१६ अन्वये निर्देशित करण्यात आलेले आहे. ऍनिमल बर्थ कन्ट्रोल (डॉग्स) रुल २००१ मध्ये समिती स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहे. तसेच न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थानी करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देश दिलेले आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात कुत्र्याची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी, रेबीज निर्मूलनासाठी आणि मनुष्य-कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी देखरेख समिती कार्य करणार आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी समितीची बैठक पार पडली. यावेळी स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार, जगदीश शेंदरे यांची उपस्थिती होती.