नवीन मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ 

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे नवमतदारांना  नोंदणी करण्याचे  आवाहन

नागपूर  : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण  मोहिम-२०२२ अंतर्गत  भारत निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  या संधीचा लाभ घेऊन शहरातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

            मतदार नोंदणीपासून एकही नागरिक वंचित राहू नये, यासाठी मुख्य निवडणूक आयोगाकडून १ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र मंगळवारी (ता. ३०) भारत निवडणूक आयोगाने  यास ५ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात नवीन मतदार नोंदणी, नावात बदल, पत्त्यात बदल किंवा अन्य दुरुस्ती ५ डिसेंबर पर्यंत करता येणार आहे.

            नागपूर शहरातील १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या सर्व  नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव नोंदवा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी केले आहे.  तसेच लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याची पहिली पायरी म्हणजे मतदार नोंदणी होय. म्हणूनच १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकांनी मतदार यादीत नाव नोदनवून लोकशाही व्यवस्थेत सहभागी व्हावे. तसेच मतदार यादीत  आधीच  नाव समाविष्ट असलेल्या मतदारांना नावात, पत्त्यात  किंवा इतर  काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठीसुद्धा अर्ज करावा असे, आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

            राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या कार्यास सहकार्य करावे. मतदार यादीत वेळेवर नाव नसल्यास होणाऱ्या अडचणीला सामोरे जाण्यापेक्षा आताच मतदार यादीत नाव नोंदणी करा.   मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्यास तात्काळ नाव नोंदणी करुन घ्यावी. तसेच इतरांना नाव नोंदणी करण्यास प्रोत्साहित करावे. छायाचित्र अथवा ठिकाण बदल व स्थनांतरामुळे ज्याचे नाव मतदार यादीतून चुकीने वगळले असतील, त्यांनी त्वरीत संबंधित बुथ लेवल ऑफीसर अथवा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा.

            ब-याचवेळा नागरिक,  लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळी आपली नावे नसल्याबाबत तक्रारी करतात यापेक्षा वेळीच अशा अभियानात सहभागी होणे देखील राष्ट्रीय कर्तव्य आहे त्यामुळे या देशाचे सजग नागरिक म्हणून या अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे. सुशिक्षित युवकांनी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला मतदार झाले अथवा नाही याबाबत विचारणा करून प्रशासनासोबत काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

        ५ डिसेंबर, २०२१ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे मतदार फॉर्म क्रमांक ६ भरून नवीन नावे पुन्हा दाखल करू शकतात. फॉर्म नंबर ७ भरून यातील मयत, स्थानांतरित यांची नावे मतदार यादीतून वगळून शकतात. तसेच फॉर्म नंबर ८ भरून मतदार यादीतील लिंग, नाव, वय याबाबतच्या चुका दुरुस्त देखील होऊ शकतात. तसेच फॉर्म क्रमांक आठ अ भरून त्याच मतदारसंघातील एका भागातून दुसर्‍या भागामध्ये नावे स्थलांतरित केल्या जाऊ शकतात. तसेच एनव्हीएसपी डॉट इन या वेबसाईटवर मतदार ऑनलाईन देखील हे सर्व प्रकारचे फॉर्म भरू शकतात. भारत निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाइन नावाचे मोबाईल ॲप तयार केलेले आहे. सदर ॲप डाऊनलोड करून त्यावरूनही  सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरता येतात. तरी सर्व मतदार व नागरिकांनी व सर्व इच्छुक उमेदवारांनी सदर यादी तपासून आपल्या हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

युनिक फ्रोजन फुड कॉर्पोरेशनमध्ये विनापरवाना आईस्क्रीम विक्री

Thu Dec 2 , 2021
नागपूर :  अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न पदार्थाची खरेदी, विक्री, वितरण, उत्पादन करीत असतांना रितसर परवाना घेणे बंधनकारक आहे. याकरीता अन्न व औषध प्रशासनातर्फे वेळोवेळी अन्न व्यवसायिकांमध्ये परवाना शिबिराचे आयोजन करुन जनजागृती करण्यात येते. परंतु काही अन्न व्यवसायिक विना परवाना आईस्क्रीमची विक्रीसाठी साठवणुक करतात. मे.युनिक फ्रोजन फुड कॉर्पोरेशन यांच्याकडे तपासणी केली असता Blue Bunny ब्रँडचे Medium Fat Icecream, Icecream […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!