बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी – कामगार मंत्री हसन मुश्रीफ  

मुंबई :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात असून या तीन नवीन योजनांमध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता 51 हजार रुपये देण्यात येणार आहे. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास मृतदेह मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च मंडळ करणार आहे व बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रीम हात किंवा पाय बसविण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले.

मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांकरिता शैक्षणिक सहाय्यसामाजिक व सुरक्षाआरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांशिवाय नवीन तीन कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत.

मंडळाने माहे जुलै 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणीनूतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणीनूतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मंडळाकडे जमा होत असलेल्या उपकर निधीमधून मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्याकरिता इयत्ता पहिलीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अर्थसहाय्यअभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकरिता विशेष सहाय्यबांधकाम कामगारांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्यबांधकाम कामगारांच्या घराकरिता अर्थसहाय्यबांधकाम कामगारांची प्रसूती तसेच गंभीर आजाराकरिता अर्थसहाय्य यासह एकूण 29 कल्याणकारी योजनांचा लाभ थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात येत आहे.

मंडळामार्फत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत राज्यात मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. ही योजना कोविड विषाणू कालावधीत फार उपयुक्त ठरल्यामुळे कामगारांमध्ये लोकप्रिय झाली. या योजनेमुळे कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मध्यान्ह भोजन योजना राबविल्याबाबत कामगार व कामगार संघटनांकडून मंडळाचे अभिनंदन होत असल्याचे नमूद करून बांधकाम कामगारांकरिता नव्याने घोषित तीन योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांनी मंडळाला दिले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

‘पीसीपीएनडीटी’ अंतर्गत प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढणे आवश्यक सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

Thu Feb 3 , 2022
 मुंबई  : पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात दोषसिध्दीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यानुसार न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.  सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली पीसीपीएनडीटी कायद्याबाबतची राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे झाली. या बैठकीत श्री टोपे यांनी या सूचना दिल्या. लिंग गुणोत्तर कमी असलेल्या जिल्हयांमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com