गडचिरोली :- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.05 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वा. राजवाडा निवासस्थान, अहेरी येथून इंदारामकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11 वाजता इंदराम येथे आगमन व कार्यकर्ता मेळावा. दुपारी 2 वाजता तिरूपती मडावी इंदाराम यांचे निवासस्थानी राखीव. दुपारी 3 वाजता इंदाराम येथून अहेरीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 03.30 वा. राजवाडा निवासस्थान,अहेरी येथे आगमन राखीव व मुक्काम. रविवार दि.06 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11.00 वा. अहेरी येथे महायुती घटक पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सभा व मार्गदर्शन शिबीर. दुपारी 04 वाजता बेलदार/ कापेवार समाज भवनाचे लोकापर्वन सोहळा, स्थळ बेलदार समाज भवन अहेरी. सोयीनुसार राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम. सोमवार दि.07 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09.30 वा. राजवाडा निवासस्थान येथून गोमणी मार्गे मुलचेराकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 10 वाजता गोमणी येथे स्वर्गीय प्रभाकर विरमूलवार यांच्या निवासस्थानी भेट व मुलचेराकडे प्रयाण. दुपारी 11 वाजता मुलचेरा येथे आगमण व जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02 वाजता राखीव. सायंकाळी 04.50 वा. मुलचेरा हेलीपॅड येथून नागपूर कडे हेलीकॉप्टरने प्रयाण.