– आज महाराष्ट्र सदन येथे सांस्कृतिक कार्यक्रम
नवी दिल्ली :- एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत महाराष्ट्र व ओडिशा या राज्यातील ‘लोकसंस्कृतीचा लोकोत्सव’ अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम आज रविवारी 23 मार्च रोजी महाराष्ट्र सदन येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांमध्ये संस्कृती, खाद्य, साहित्यिक, वैचारिक देवाण-घेवाण व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते या अंतर्गतच आज रविवारी 23 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवणारा लोकसंस्कृतीचा लोकोत्सव होणार आहे.
यामध्ये महाराष्ट्रातून पालघर जिल्ह्याचे आदिवासी लोककला कलाकार वामन माळी समूहासह आदिवासी लोककला 30 ते 40 कलाकार आपली कला सादर करतील तर ओडिशाचे लोककलाकार दयानंद पांडा आणि त्यांचा चमू हे ओडिसा सम्भलपुरी नृत्य सादर करतील.
हा कार्यक्रम महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत आहे.
या सांस्कृतिक लोकउत्सव कार्यक्रमात अधिक मराठी लोकांनी उपस्थित राहून कलाकारांना दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे.