संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– तिरंगामय ड्रैगन पैलेस बघणा-याकरिता लोकांची तुफान गर्दी
कामठी :- नागपूर जिल्हयातील कामठी येथील जगप्रसिध्द ड्रैगन पैलेस टेम्पल तिरंगाच्या झगमगात संपूर्ण तिरंगामय झाले होते. ड्रैगन पैलेस च्या आकर्षीत रोषणाईला बघण्याकरिता भेट देणा-या लोकांची भर पावसातही तुफान गर्दी झाली होती.
ड्रैगन पैलेस परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्य मंत्री अँड. सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारेहण करण्यात आले. तसेच परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले. तदनंतर कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले व हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या परिसरात सकाळी 8.30 वाजता व दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र येथे सकाळी 9 वाजता ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या स्वातंत्र्य विरांप्रति कृतज्ञता व्यक्त करत असतांना प्रत्येक नागरिकांनी देशाप्रति आपले कर्तव्य बजावले पाहीजे असे आव्हान अँड. सुलेखा कुंभारे यांनी उपस्थितांना केले.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ओगावा सोसायटी, ड्रैगन पैलेस टेम्पल, हरदास एज्यकेशन अँड कल्चरल सोसायटी, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र ड्रैगन इंटरनैशनल स्कूल, हरदास हायस्कूल, बहूजन रिपब्लिकन एकता मंच, , ईत्यादी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकगण व येथील पदाधिकारी,धम्मसेवक, धम्मसेविका,शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.