नागपूर :- नागपूर शहरातील फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्वत्र धडक कारवाई सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरातील कारवाईला गती देण्यात आली आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणच्या अतिक्रमणाविरोधात पाच पथकांच्यामार्फत धडक कारवाई केली जात आहे.बुधवार ७ ऑगस्ट पासून एकच वेळी पथक कार्यरत झाले असून, नागपूर शहरात विभिन्न क्षेत्रात कारवाई सुरू करण्यात आली.
सदर कारवाई सहायक आयुक्त अतिक्रमण विभाग हरिष राऊत, प्रवर्तन अधिक्षक संजय कांबळे क.अभियंता अतिक्रमण भास्कर माळवे यांच्या पथकद्वारे करण्यात आली. यात धरमपेठ झोन क्र ०२ अंतर्गत झोन कार्यालय ते सिताबर्डी परिसर ते मोर भवन चौक ते मुंजे चौक झाशी राणी चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 02 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच गांधीबाग झोन क्र ०६अंतर्गत झोन कार्यालय महाल चौक ते बडकस चौक ते शहीद चौक ते तीनल चौक ते नंगा पुतला चौक ते इतवारी बाटा शोरूम परिसर कडे ते गांजाखेत चौक ते भावसार चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 01 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
याशिवाय धंतोली झोन क्र ०४ अंतर्गत झोन कार्यालय ते मेडिकल चौक परिसर पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे ठेले व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तर गांधीबाग झोन क्र ०६ आणि सतरंजीपुरा झोन क्र ०७ अंतर्गत झोन कार्यालय ते मारवाडी चौक ते नेहरू पुतळा चौक ते भारत माता चौक ते गोळीबार चौक ते जुना भंडारा रोड ते शहीद चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.
मंगळवारी झोन क्र १० अंतर्गत झोन कार्यालय ते सदर परिसर पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.