पंचतारांकित व्यवस्था असलेल्या क्रीडा संकुलामुळे उत्तम खेळाडू तयार होणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

स्व. रामजीवन चौधरी क्रीडा संकुलाचे लोकार्पण

नागपूर : मध्य नागपुरात मुलांना खेळण्यासाठी मैदाने नसल्यामुळे येथील मुले खेळण्यापासून वंचित होती. मात्र नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून गाडीखाना येथे ३ कोटी ९३ लाख रुपये खर्च करून पंचतारांकित व्यवस्था असलेल्या स्व. रामजीवन चौधरी यांच्या नावाने क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून मध्य नागपुरातील अनेक खेळाडू तयार होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रभाग १८ अंतर्गत गाडीखाना येथील स्व. रामजीवन चौधरी क्रीडा संकुलाचे लोकार्पण रविवारी (ता. २७) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पटू मालविका बन्सोड यांनी बॅडमिंटन खेळून क्रीडा संकुलाचे लोकार्पण केले. याशिवाय रामजी पहेलवान मार्गाचे भूमिपूजन व शुक्रवारी तलाव ते अशोक स्तंभ पर्यंतच्या उमरेड रस्त्याचे भूमिपूजन सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. तसेच मालविका बन्सोड हिचा सत्कारही केला.

नवी शुक्रवारी हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, माजी आमदार अशोक मानकर, उपमहापौर मनीषा धावडे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, धंतोली झोन सभापती वंदना भगत, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका सुमेधा देशपांडे, नेहा वाघमारे, नगरसेवक किशोर वानखेडे, सरला नायक, विद्या कन्हेरे, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, स्व. रामजीवन चौधरी यांचे सुपुत्र डॉ. संजीव चौधरी, माजी स्थायी समिती सभापती बंडू राऊत, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर आदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, स्व. रामजीवन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली हे सौभाग्य आहे. रामजीवन चौधरी हे सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले लोकनेते होते. विदर्भावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमी आवाज उठविला. आशा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने नागपूर महानगरपालिकेने क्रीडा संकुलाची निर्मिती याबद्दल नितीन गडकरी यांनी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते व प्रभागातील सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले.

नागरिकांनी या सुविधेचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा. पालकांनी आपल्या मुलांना रोज मैदानावर पाठवावे. कारण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच खेळ सुद्धा आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी नितीन गडकरी यांनी केले.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, मध्य नागपूरात मनपातर्फे युवकांना खेळण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी त्यांनी आमदार प्रवीण दटके यांचे अभिनंदन केले

यावेळी आमदार प्रवीण दटके, मध्य नागपूरच्या विकसीत सर्वात योगदान स्थानिक नागरिकांचे आहेत. त्यांच्या सहयोगामुळे आज सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली. यात तळ मजल्यावर बॅडमिंटन कोर्ट, पहिल्या माळ्यावर टेबल टेनिस आणि दुसऱ्या माळ्यावर बुद्धीबळ खेळाचे दोन कक्ष निर्माण केले आहे. सोबतच बसण्याची व्यवस्था, लॉकर, आणि पार्कींगची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. तसेच या भागात बास्केट बॉल मैदान सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. येथील खेळाडूंनी या व्यवस्थेला लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी प्रवीण दटके यांनी केले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले.

यावेळी नगरसेविका सुमेधा देशपांडे यांनी स्व. रामजीवन चौधरी यांचा जीवन परिचय करून दिला. तसेच क्रीडा संकुलाबद्दल विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सुरेखा देशकर तर आभार नगरसेवक प्रमोद चिखले यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नाग नदीवरील पूलाचे ना.गडकरींच्या हस्ते लोकार्पण

Mon Feb 28 , 2022
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ काचीपुरा येथे नाग नदीवरील पूलाचे रविवारी (ता.२७) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नासुप्रचे विश्वस्त ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, नगरसेविका रुपा राय, नगरसेविका उज्ज्वला शर्मा आदी उपस्थित होते. प्रारंभी केंद्रीय नितीन गडकरी यांनी पूलाच्या निमिर्ती कार्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com