नागपूर :- स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी ओ बी सी मोर्चा नागपूर शहराच्या वतीने मोर्चाचे अध्यक्ष सुनील हिरणवार माजी नगरसेवक यांचे नेतृत्वात महाराजबाग येथील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. साहेबांनी तळागाळातील लोकांचे जीवन सुकर व्हावे म्हणून शेतीत सुबत्ता यावी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. कृषी क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी कृषी विद्यापीठ स्थापन करून शेती उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग आणि शोधाला प्रोत्साहन दिले असे याप्रसंगी सुनील हिरणवार विचार व्यक्त केले.
याप्रसंगी कैलास छाबरिया, हेमंत सोनकर, तरुण गेडाम, कृष्णा सिरसवार, वरुण मेहाडिया, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे प्रा. रमेश पिसे, प्रदीप मुन, संविधान परिवारचे प्रा. राहुल मुन, संजय ठाकरे, राजू चौहान, भाऊराव कोकने, सुरेश भूत, नरेश गायकवाड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.