– एम एम पी कंपनी तील अनेक कार्यरत कामगारांचा जीव धोक्यात….
उमरेड :- उमरेड शहरातील एम एम पी कंपनी ही ग्राम पंचायत धुरखेडा परिसरात असुन ही आग आज 6 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास घडली असल्याची माहिती प्राप्त झाली. स्फोट झाल्याने आग लागल्याची गंभीर घटना घडली या घटने मुळे अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती घटना स्थळी उपस्थित असलेल्या जनसमुदाया कडुन ऐकावयास मिळाली….तर याठिकाणी 30 ते 35 कामगार असल्याची शक्यता नाकरता येत नाही.आग लागल्याची घटना माहिती होताच विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम हे घटनास्थळी दाखल झाले तर माझी आमदार राजू पारवे यांनीही उपस्थिती दर्शवली. या घटनेमुळे पोलीस उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन, सोबत पोलीस निरीक्षक धनाजी जडक हे आपल्या ताफायसह घटनास्थळी दाखल झाले.या गंभीर घटनेची माहिती मिडताच दंगा नियंत्रण पथक दाखल झाली. काही अनुचित घटना घडू नये म्हणून सडेतोड प्रयत्न करीत होते घटनास्थळी आग विझविण्यासाठी उमरेड न प ची अग्नी शामक चमु घटनास्थळी उपस्थित होती पण पाण्याचा मारा केल्यास पुन्हा आग आक्रमक भूमिका घेऊ शकते म्हणून पाणी अग्नी शामक दल आग थोडी शांत होण्याची वाट पहात होते.ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच उमरेड शहरातील व सभोवतालातील जनतेनी गर्दी केली…. आरोग्य वाहिका मोठ्या प्रमाणात हजर झाल्या. यामुळे संख्या किती आहे हे वृत्त लिहिस्तेवर स्पस्ट झाले नाही.