अरोली :- धर्मापुरी येथील अर्जदार असलेले शेतकरी हरिदास बाजीराव मदनकर (60)यांनी धर्मापुरी येथील गैरअर्जदार असलेले शेतकरी विनायक हरिश्चंद मदनकर(45) यांच्यावर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अवैद्यरित्या अर्जदाराच्या जमिनीवर रस्ता केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई व अंमलबजावणी करण्याबाबत मागील दोन वर्षापासून तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधी, संबंधित मंत्रालय यांच्याकडे सतत लेखी निवेदन देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहे व त्याच्या सतत पाठपुरावा करत आहेत.
याची दखल घेत अखेर मौदा नायब तहसीलदार ओमप्रकाश अजबराव काळे यांनी 27 जानेवारी 2025 ला मौदा गट विकास अधिकारी यांना गैरअर्जदार विनायक मदनकर यांच्यावर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अवैद्यरित्या अर्जदाराच्या जमिनीवर रस्ता केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई व अंमलबजावणी करण्याबाबत पत्र दिले आहेत. व त्याची एक प्रत अर्जदार शेतकरी हरिदास मदनकर यांना तलाठी कोलते यांच्यामार्फत पाठवलेली आहे.
दोन वर्षांपूर्वीपासून प्रलंबित असलेले हे प्रकरण गट विकास अधिकारी किती दिवसात मार्गी लावतात याकडे धर्मापुरी सह संपूर्ण मौदा तालुक्याचे लक्ष वेधले आहे.