संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6 :- नव्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या 1 जुलै या तारखेला मुदतवाढ दिल्याने नियोजित 5 जुलै च्या सायंकाळी 5 च्या नंतर कामठी नगर परिषद ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
कुणाचे नाव एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेले होते, एकाच कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव एका प्रभागात तर दुसऱ्याचे नाव दुसऱ्याच प्रभागात गेले होते तर कुणाचा तर प्रभागच बदलण्याचा अनुभव आल्याने कामठी नगर परिषद ने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर 122 नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते .हे आक्षेप निकाली काढता काढता अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले.अंतता कामठी नगर परिषद चे प्रशासक श्याम मदनूरकर व मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी सोमवारी स्वता तपासणी करून काल 5 जुलै ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली मात्र यावरही अनेक नागरिक समाधानी नसल्याची माहिती असून लवकरच न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगण्यात येते.
कामठी नगर पालिकेने केली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com