अभिनेत्री संगीता तिवारी यांनी भेट देऊन लाईट हाऊस वॉटर पार्क येथे पर्यटकाचे मनोरंजन केले व पर्यटकांशी हितगुज साधून फिचरची शुटिंग करण्याचे दिले आश्वासन
पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
रामटेक – पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे यांनी निर्मिती केलेला संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले रामधाम तीर्थक्षेत्र व लाईट हाऊस वॉटर पार्क मनसर येथे लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेला सर्वात मोठा ओम, वैष्णव देवीचे मंदिर, बर्फानी महाराज यांचे प्रसिद्ध शिवलिंग व अँग्रो पार्क अशा निसर्गरम्य वातावरणात येत्या काही दिवसांत सुवी बर्ड पार्क सुरू होत आहे.

अशा निसर्गरम्य स्थळी भोजपुरी, तेलगू, मराठी चित्रपटांत विविध प्रकारच्या भूमिका केलल्या अभिनेत्री संगीता तिवारी यांनी भेट देऊन लाईट हाऊस वॉटर पार्क येथे पर्यटकाचे मनोरंजन केले व पर्यटकांशी हितगुज साधून फिचरची शुटिंग करण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी रामधाम येथील वैष्णव देवीचे दर्शन घेतले. यावेळी पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी अभिनेत्री संगीता तिवारी यांनी खिंडशी जलक्रीडा येथे भेट देऊन बोटिंगचा आनंद घेतला व स्नेहभोजन केले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले गोविंद पोतदार अध्यक्ष राधाकृष्ण हॉस्पिटल ट्रस्ट, हरीश अग्रवाल, डॉ. उदय जैन, एस.पी. सिंग फिल्म प्रोड्यूसर, राजेश भट्ट फिल्म डायरेकटर, धर्मर्वीजी, महावीर प्रसाद, आरती सिन्हा, राजकुमार यांनीसुद्धा भेट देऊन लाईट हाऊस वॉटर पार्क व रामधाम तीर्थ क्षेत्राविषयी गौरवोद्गार काढले
सुषमा मर्जिवे ,
रामटेक