संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान – कन्हान शहर विकास मंचद्वारे जागतिक महिला दिवस , छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार) , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृति दिवस निमित्य संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करुन पोलीस महिला कर्मचारी , डॉक्टर , नर्स यांना नोटबुक , पेन देऊन सत्कार करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
शुक्रवार (दि.१०) मार्च ला कन्हान शहर विकास मंचद्वारे जागतिक महिला दिवस , छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार) , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृति दिवस निमित्य संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर यांनी महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर कन्हान पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर आणि पोलीस महिला कर्मचारी यांना नोटबुक , पेन देऊन सत्कार करण्यात आला . तसेच प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे जाऊन डॉ.तेजस्वीनी गोतमारे , डॉ चौधरी सह आदि नर्स यांना नोटबुक , पेन देऊन सत्कार करुन कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन हरिओम प्रकाश नारायण यांनी केले .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , योगराज आकरे , हरीओम प्रकाश नारायण , हर्षल नेवारे , रवि महाकाळकर , वसंतराव उरकुडे , प्रकाश कुर्वे , मुकेश गंगराज , ओमप्रकाश शेंडे सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .