शेतकऱ्यांनी बीजप्रक्रियेवर भर द्यावा-तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी ता प्र 24:-आजच्या स्पर्धात्मक युगात खरीप पिकावरील कीड रोग टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियेवर भर देऊन पेरणी करावी असे आवाहन कामठी तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत यांनी कामठी तालुक्यातील आजनी व गादा गावात कृषी विभागातर्फे आयोजित बीज प्रक्रिया कार्यक्रमात व्यक्त केले
कामठी तालुक्यातील आजनी व गादा गावातील शेतकऱ्यांना सिंजेंटा कंपनी चे प्रतिनिधीनी सिड ड्रेसिंग ड्रम द्वारे बीज प्रक्रिया करून दाखविण्यात आली.दरम्यान बीज प्रक्रियेकरिता कृसर कीटकनाशक औषध बियाणे लावून देण्यात आले.यानुसार 45 क्विंटल बियाणे ला बीज प्रक्रिया करण्यात आली.
याप्रसंगी कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, कामठी तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत, कृषी अधिकारी नंदनवार, मंडळ कृषी अधिकारी वैराग देशमुख, कृषी पर्यवेक्षक कामठी 1,एस आर ठाकरे,कृषी पर्यवेक्षक कामठी 2 तसेच मोठ्या संख्येत शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्व.श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी कार्यक्रम

Fri Jun 24 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठीता प्र 24:-भारतीय जनसंघ चे संस्थापक श्रद्धेय स्व.श्री श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा पुण्यतिथि कार्यक्रम आज भाजपा कार्यालय जयस्तंभ चौक कामठी येथे भारतीय जनता पार्टी कामठी शहर च्या वतिने आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया द्वारा पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पित करण्यात आली दरम्यान स्व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com